बहीण-भावाचा उत्कर्ष करणारे रक्षाबंधन !

बहिणीने भावाला राखी बांधण्याहून अधिक महत्त्वाचे आहे, एखाद्या तरुणाने किंवा पुरुषाने एखाद्या तरुणीकडून अथवा स्त्रीकडून राखी बांधून घेणे. त्यामुळे त्यांचा, विशेषतः तरुणांचा आणि पुरुषांचा तरुणीकडे किंवा स्त्रीकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो.

रक्षाबंधन : संकल्पशक्तीचे प्रतीक

‘रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा आणि अक्षता लावून ‘माझा भाऊ भगवत्प्रेमी होवो’, असा संकल्प करते. भावाच्या मनातही ‘माझी बहीण चारित्र्यसंपन्न आणि भगवत्प्रेमी होऊ दे’, असा विचार येतो.

श्रावण पौर्णिमा (नारळी पौर्णिमा)

श्रावण पौर्णिमेला समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे.

अक्षय्य तृतीया सण साजरा करण्याची पद्धत

साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तिलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात आहे. यामागील अध्यात्मशास्त्र आपण समजून घेऊया.

गुढीपाडवा म्हणजे संकल्पशक्तीची मुहूर्तमेढ !

गुढीपाडवा हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी रामतत्व १०० पटीने अधिक कार्यरत असते. गुढीच्या माध्यमातून कार्यरत असलेली ईश्‍वराची शक्ती जिवाला लाभदायक असते.

गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाचे पंचांग पूजन आणि श्रवण

गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे आणि पंचांगात दिलेले वर्षफल वाचावे. जुन्या काळात हे वर्षफल प्रत्येक घरी जाऊन ज्योतिषी वाचत असत. तो गुढीपाडव्याचा एक विधीच होता.

जीवनाचे गुह्य ज्ञान शिकवणारी गुढी !

जीवनात काय साध्य करायचे आहे, याचे गुढी हे प्रतीक आहे. गुढी हे त्यागमय जीवन जगण्याचे प्रतीक आहे. जीवनाचा आदर्श असलेली गुढी आपल्याला आपल्या जीवनाचे गुह्य ज्ञान दाखवते.

चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेस वर्षारंभ करण्याची कारणे

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला प्रारंभ झाला, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.

गुढीपाडव्याच्या दिवशी काढावयाची सात्विक रांगोळी

देवतांचे तत्व आकृष्ट करण्याचे सामर्थ्य असणार्‍या सात्विक रांगोळ्या सणांच्या दिवशी काढा !