‘अक्षय्य तृतीये’च्या दिवशी पितरांचे पूजन केलेल्या उदक-कुंभाचे ब्राह्मणाला दान देणे’, या कृतीचा सूक्ष्मातील परिणाम दर्शवणारे चित्र

या कृतीतून पितरांच्या अतृप्त इच्छांची पूर्ती होऊन त्यांना गती प्राप्त होते आणि ते पुढील लोकांतील प्रवास करतात.

प्रतापी वीर परशुराम !

वैशाख शुक्ल पक्ष तृतीया या दिवशी महापराक्रमी वीर परशुरामाचा जन्म झाला. दशावतारांतील हा सहावा अवतार होय. भृगुकुळातील ऋषि जमदग्नी आणि देवी रेणुका यांचा मुलगा परशुराम !

Exclusive Video : हनुमान जयंती पूजाविधी

हा पूजाविधी सर्वसाधारणपणे सगळ्यांना करता यावा यादृष्टीने सिद्ध (तयार) केला आहे. कोणाला जर षोडशोपचार पद्धतीने पूजा करता येत असेल तर ते त्याप्रकारे पूजाविधी करू शकतात किंवा काही ठिकाणी परंपरेप्रमाणे पूजाविधी ठरलेला असतो. ते त्याप्रमाणे पूजन करू शकतात.

‘हनुमान जन्मोत्सव’ म्हणण्याऐवजी ‘हनुमान जयंती’ म्हणणेच योग्य !

हनुमान चिरंजीव असल्याने त्याची जयंती साजरी करण्याऐवजी जन्मोत्सव साजरा करा’, अशा आशयाचे लिखाण सध्या सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. याविषयी शास्त्रोक्त परिभाषेत सांगितलेले स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे.

#Gudhipadva : गुढी उतरवतांना कोणती प्रार्थना करावी  ?

ज्या भावाने गुढीची पूजा केली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला तिच्यातील चैतन्य मिळते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून व प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी.

#Gudhipadva : ब्रह्मदेवाकडून सत्त्वगुण, चैतन्य, ज्ञानलहरी आणि ब्रह्मतत्त्व यांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणावर प्रक्षेपण होणे अन् ते ग्रहण करण्यासाठी गुढी उभी केली जाणे !

इतर दिवसांच्या तुलनेत गुढीपाडव्याला ब्रह्मदेवाकडून सत्त्वगुण, चैतन्य, ज्ञानलहरी आणि सगुण-निर्गुण ब्रह्मतत्त्व यांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणावर प्रक्षेपण होत असते. हे प्रक्षेपण ग्रहण करण्यासाठी गुढीपाडव्याला दारापुढे गुढी उभी केली जाते.

#Gudhipadva : गुढी उभारण्याच्या वेळी करावयाची प्रतिज्ञा अन् प्रार्थना

‘आम्ही समस्त हिंदू गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केवळ भारतातच नव्हे, तर पृथ्वीवर सर्वत्र हिंदु धर्म प्रस्थापित करून अखिल मानवजातीला सुसंस्कृत आणि सुख-समृद्धीयुक्त जीवन देण्याचा निश्चय करतो.

#Gudhipadva : हिंदूंच्या अद्वितीय कालमापन पद्धतीचे अलौकिकत्व सांगणारा गुढीपाडवा !

जसा हिंदूंचा कुठलाही सण हा मौजमजेचा विषय नाही, तर मांगल्य, पावित्र्य, चैतन्य यांचा आनंदसोहळा आहे, तसाच गुढीपाडवाही आहे !

#Gudhipadva : जाणून घ्या पंचांगातील गुढीपूजन करतांनाचा ‘देशकाल’ !

कोणताही धार्मिक विधी करतांना देशकाल कथनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूजेचा संकल्प करण्याआधी देशकाल म्हटले जाते. यातून मनुष्याला एकूण अनंत काळाची व्याप्ती कळून येते. यातून त्याला स्वत:च्या सूक्ष्मत्वाची जाणीव झाल्याखेरीज रहात नाही.

#Gudhipadva : गुढीपाडव्याला कोणती प्रार्थना करावी ?

‘हे ईश्‍वरा, आज तुझ्याकडून येणारे शुभाशीर्वाद आणि ब्रह्मांडातून येणार्‍या सात्त्विक लहरी मला जास्तीतजास्त ग्रहण करता येऊ देत. या लहरी ग्रहण करण्याची माझी कुवत नाही. मी तुला संपूर्ण शरण आलो आहे. तूच मला या सात्त्विक लहरी ग्रहण करायला शिकव’, हीच तुझ्याचरणी प्रार्थना !