#Gudhipadva :जाणून घ्या गुढीपाडव्याचे नैसर्गिक महत्त्व !

सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्‍भगवद्‍गीतेत (१०:३५) म्हटले आहे.

#Gudhipadva : VIDEO – गुढीपाडव्याचे अद्वितीय महत्त्व

चैत्र शुद्ध प्रतिपदा ! या दिवसापासून पुन्हा देव, ऋषी, पितर, मनुष्य आणि भूत यांची पूजा करायला आरंभ करायचा, त्यांचे आशीर्वाद मिळवायचे आणि आपापली कर्तव्यकर्मे करायला आरंभ करायचा, हाच पाडवा साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.’

भस्माचे महत्त्व

‘भ’ म्हणजे ‘भर्त्सनम्’ (नाश होणे) आणि ‘स्म’ म्हणजे ‘स्मरणम्’ (स्मरण करणे) थोडक्यात ज्यामुळे आमची पापे नाश पावतात आणि आम्हाला ईश्वराचे स्मरण होते, ते भस्म !

शिवाची वैशिष्ट्ये !

शिवाचा डावा डोळा म्हणजे पहिला डोळा, उजवा डोळा म्हणजे दुसरा डोळा आणि भ्रूमध्याच्या जरा वर सूक्ष्मरूपात असलेला ऊर्ध्व नेत्र म्हणजे तिसरा डोळा होय. ऊर्ध्व नेत्र हे डावा अन् उजवा अशा दोन्ही डोळ्यांच्या संयुक्त शक्तीचे प्रतीक आहे आणि अतींद्रिय शक्तीचे महापीठ आहे.

शिवाचे वाहन : नंदी

वृषभरूपातील नंदी हे शिवाचे वाहन असून त्याला शिवपरिवारात महत्त्वाचे स्थान दिले आहे. शिवाचे दर्शन घेण्याआधी नंदीचे दर्शन घेतले जाते.

रुद्राक्षधारण

शिवपूजेच्या वेळी रुद्राक्षांची माळ घालावी. नाथ संप्रदायी, वाम संप्रदायी आणि कापालिक हे रुद्राक्षाचा वापर करतात. योगीही रुद्राक्षांच्या माळा धारण करतात.

शिवोपासनेची वैशिष्ट्ये आणि शास्त्र

शिवभक्तांना महाशिवरात्रीचा पुरेपुर लाभ व्हावा, यासाठी शिवाच्या उपासनेची वैशिष्ट्ये आणि त्यांमागील शास्त्र जाणून घेऊया.

शिवाला बेलाचे पान वहाण्याच्या पद्धतीमागील अध्यात्मशास्त्र

पिंडीत आहत (पिंडीवर पडणारे पाणी आपटल्याने निर्माण होणार्‍या) नादातील + अनाहत (सूक्ष्म) नादातील, अशी दोन प्रकारची पवित्रके असतात. ही दोन पवित्रके अधिक वाहिलेल्या बिल्वदलातील पवित्रके अशी तीन पवित्रके खेचून घेण्यासाठी तीन पाने असलेला बेल शिवाला वहावा.

Video : महाशिवरात्री विशेष : जाणून घ्या शिवपिंडीला बेलपत्र कसे वहावे ?

बेलाचे पान शिवपिंडीवर उपडे वाहिल्यावर त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे भाविकाला अधिक लाभ होतो. शिवाला बेल ताजा न मिळाल्यास शिळा चालतो; परंतु सोमवारचा बेल दुसर्‍या दिवशी चालत नाही.

Video : महाशिवरात्री विशेष : जाणून घ्या शिवपिंडीला प्रदक्षिणा कशी घालावी ?

शाळुंकेच्या स्रोतातून शक्ती बाहेर पडत असल्याने सर्वसाधारण भाविकाने तो स्रोत वारंवार ओलांडल्यास त्याला शक्तीचा त्रास होऊ शकतो; म्हणून शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणाच घालावी. स्वयंभू किंवा घरातील लिंगास हा नियम लागू नाही.