अशांकडून हिंदूंनी दागिन्यांची खरेदी का करावी ?

एम्.पी. अहमद यांच्या मालकीचे ‘मलबार गोल्ड अँड डायमंड्स’ या आस्थापनेच्या अक्षय्य तृतीयेच्या प्रीत्यर्थ विज्ञापनात अभिनेत्री करीना कपूर खान यांच्या कपाळावर टिकली नाही. यामुळे या विज्ञापनाचा हिंदूंकडून विरोध होत आहे.

केवळ हिंदूंनीच नियमांचे पालन करायचे का ?

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवाज न्यून ठेवण्याच्या केलेल्या आवाहनावर हा निर्णय घेण्यात आला.

असा इतिहास असणारी देशात सहस्रो ठिकाणे आहेत !

देहलीतील कुतूबमिनार येथील २७ हिंदु आणि जैन मंदिरे पाडून तेथे सध्या असलेली ‘कुव्वत उल इस्लाम मशीद’ बांधण्यात आली, अशी माहिती प्रसिद्ध पुरातत्वतज्ञ के.के. महंमद यांनी दिली आहे.

अशी धमकी देण्याचे धाडस होतेच कसे ?

मशिदींसमोर हनुमान चालिसा म्हटल्यास आम्हालाही मंदिरांसमोर बसून भोंग्यांवर कुराणाचे पठण करावे लागेल आणि त्यात आम्ही महिला आघाडीवर असू, अशी धमकी अलीगड येथील समाजवादी पक्षाच्या नेत्या रूबीना खानम यांनी दिली आहे.

हे पोलिसांना लज्जास्पद !

वर्ष २०१२ मध्ये मुंबईच्या आझाद मैदानात दंगल घडवणाऱ्या रझा अकादमीच्या ‘इफ्तार पार्टी’ला मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे उपस्थित राहिले. या दंगलीच्या वेळी जिहाद्यांकडून महिला पोलिसांचा विनयभंग करण्यात आला होता.

अशा घटना हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !

हनुमान जयंतीच्या मिरवणुकांवर उत्तराखंड, देहली आणि आंध्रप्रदेश या ३ राज्यांत धर्मांधांनी आक्रमण केले, तर कर्नाटकात सामाजिक माध्यमांतून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यावरून धर्मांधांनी हनुमान मंदिराची तोडफोड केली.

असे बोलण्याचे धाडस होतेच कसे ?

एकाही भोंग्याला हात लावलात, तर आम्ही विरोध करायला सर्वांत पुढे असू, ‘छेडोगे तो छोडेंगे नहीं’, हे आमचे घोषवाक्य आहे, अशी चेतावणी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे मुंब्रा येथील अध्यक्ष मतीन शेखानी यांनी मनसेला दिली आहे.

मशीद किंवा चर्च येथे दिवाळी साजरी होते का ?

पुणे येथील साखळीपीर तालीम येथील राष्ट्रीय मारुति मंदिरात १६ एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेसकडून इफ्तारचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुसलमानांचा रोजा सोडण्यात येणार आहे.

मशीद आणि चर्च येथे वेदमंत्रपठण होते का ?

बेलूर (कर्नाटक) येथील प्रसिद्ध चेन्नकेशव मंदिर येथे १३ एप्रिल या दिवशी रथोत्सवाचा प्रारंभ कुराण पठणाने करण्याची कथित ऐतिहासिक परंपरा कायम ठेवण्यात आली. या परंपरेला हिंदुत्वनिष्ठांनी वैध मार्गाने विरोध केला होता.

मौलवींचा उद्दामपणा जाणा !

‘३ मे या दिवशीच काय, प्रलय जरी आला, तरी भोंगे काढणार नाही’, अशी उद्दाम प्रतिक्रिया मालेगावातील मौलवींनी दिली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्याची समयमर्यादा दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.