रिक्शाचालकांकडून लूट !

वर्ष २०१२ नंतर राज्यात सर्वच रिक्शांना ‘डिजिटल मीटर’ची सक्ती करण्यात आली. यानंतर अनेक शहरांमध्ये प्रवाशांना योग्य दरात प्रवास करता येईल, अशी अपेक्षा होती; मात्र सध्या तरी हे चित्र उलटेच पहायला मिळत आहे.

अग्नीशमन प्रशिक्षण आवश्यक !

येणाऱ्या भीषण आपत्काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. त्या वेळी स्वतःसह कुटुंबियांच्याही जीविताचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. यासाठी प्रत्येकानेच अग्नीशमन प्रशिक्षण घेणे, हे केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नव्हे, तर अन्य वेळीही उपयुक्त आहे.

हिंदूंवर पक्षपाती कारवाई !

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे भगवा झेंडा लावल्यानंतर धर्मांधांनी त्याला आक्षेप घेऊन शहरात दंगल घडवली.

नूतन संमेलनाध्यक्षांच्या समोरील आव्हाने !

संमेलन हे साहित्यजनांना न्याय देणारे, मराठीसाठी ठोस प्रयत्नशील असणारे, श्री सरस्वतीपूजनाची परंपरा परत चालू करण्याची संधी असलेले, असे होण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. ९५ व्या संमेलनाध्यक्षांना ‘हे संमेलन किमान भाषिक उत्कर्षासाठी व्हावे’, यासाठीच झटावे लागेल !

अतिरेक टाळा !

लहान मुलांची पालटती जीवनशैली आणि आहार यांमुळे त्यांच्यावर कसे परिणाम होत आहेत, याविषयी ‘भारतीय बालरोगतज्ञ संघटने’चे राष्ट्रीय अध्यक्ष आधुनिक वैद्य उपेंद्र किंजवडेकर यांनी सांगितलेली सर्वांनाच विचार करायला लावणारी ही माहिती !

वारकऱ्यांची गैरसोय टाळा !

चैत्र वारीला एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती असेल, याचा कदाचित् विचारच न झाल्याने ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती’ आणि प्रशासन यांच्या नियोजनाचा अभाव नेहमीप्रमाणे दिसून आला.

विजेची बचतही आवश्यक !

प्रत्येकाने घरामध्ये विजेचा वापर करतांना काळजी घ्यायला हवी. आवश्यकता नसल्यास तात्काळ वीज उपकरणे, उदा. पंखा, दिवे बंद करणे, तसेच वातानुकूलित यंत्राचा वापरही आवश्यकता असल्यासच करणे.

‘महाराष्ट्र केसरी’चा योग्य सन्मान हवा !

अनेक मल्लांना धोबीपछाड करत पृथ्वीराज पाटीलही ‘महाराष्ट्र केसरी’ झाले; मात्र त्यांच्या घामाला योग्य सन्मान मिळाला नाही, असे वाटल्यास चुकीचे ते काय ?

विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने घडवा !

विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ या विषयावर बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विद्यार्थ्यांच्या मनाची एकाग्रता का होत नाही ? परीक्षांची भीती का वाटते ? परीक्षेला सामोरे कसे जावे ? खरा आनंद कशामध्ये आहे ?’, या आणि यांसारख्या अनेक सूत्रांवर चर्चा केली.

सौंदर्य स्पर्धा नको !

सौदर्यं स्पर्धांमुळे मुलींवर आणि लहान मुलांवरही अयोग्य संस्कार होणार, हे नक्की ! सद्यःस्थितीत जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लहानपणापासूनच हिंदवी स्वराज्य आणि हिंदु धर्म यांचे संस्कार केले, तसे संस्कार करणे आवश्यक आहे. राणी लक्ष्मीबाई, राणी चेन्नम्मा, अहिल्यादेवी होळकर यांसारख्या कर्तृत्ववान विरांगनांचे अनुकरण करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या स्पर्धा भरवणेच योग्य !