पाकिस्तानी नागरिक : भारतीय तंबूत शिरलेला उंट !

अँटॉप हिल (मुंबई) येथे २३ वर्षे अवैधपणे राहून एका भारतीय महिलेशी निकाह करून संसार थाटणार्‍या सिराज खान याची अखेर पाकिस्तानात हकालपट्टी करण्यात आली.

जनतेला वेठीस धरण्याचा घातक ‘ट्रेंड’

नवीन नियमानुसार रेल्वे भरतीतील २० टक्के कोट्याची अट रहित करावी आणि ‘रेल्वे अ‍ॅक्ट अ‍ॅप्रेन्टीस’ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींना रेल्वे सेवेत कायमस्वरूपी भरती करून घ्यावे, या दोन प्रमुख मागण्यांसाठी रेल्वे प्रशिक्षणार्थींनी माटुंगा येथे केलेल्या ‘रेल रोको’ने समस्त मुंबईकरांना साडेतीन घंट्यांहून अधिक काळ वेठीस धरलेे.

राज ठाकरे यांचे भाषण… हिंदूंना धोक्याची घंटा !

मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर गुढीपाडव्याच्या निमित्ताने १८ मार्चला झालेल्या भव्य मेळाव्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राममंदिराच्या प्रश्‍नावरून हिंदू-मुसलमान यांमध्ये धार्मिक दंगली घडवल्या जातील, असे वक्तव्य करून एक प्रकारे हिंदूंना धोक्याची घंटा दिली आहे का ?, असा प्रश्‍न उपस्थित होतो.

पोलिसांनी समाजासमोर योग्य आदर्श ठेवावा !

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या रंगपंचमी या सणाच्या वेळी एका शहरातील पोलीस त्यांच्या अधिकार्‍यांसह चित्रपटातील गाण्याच्या तालावर नाच करत रंग खेळतांना दिसले. त्यांच्या या प्रकाराचे चलचित्र (व्हिडिओ) ‘व्हायरल’ झालेे. या चलचित्राला अनेक लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

नगरसेवक ‘जनसेवक’ असावा !

एका शहरातील एका पक्षाच्या नगरसेवकाने त्याची भलीमोठी चारचाकी आलिशान गाडी तेथील पोलीस ठाण्याच्या समोरच चुकीच्या पद्धतीने उभी केली होती. त्यामुळे त्या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. गाडी उभी केल्याच्या बाजूला एक गल्ली असल्याने तेथे वाहने वळवतांनाही वाहनचालकांना अडचण येत होती.

कोरेगाव भीमा प्रकरणी अन्यायग्रस्तांना वाली कोण ?

कोरेगाव भीमा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी १३ मार्चला कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारातील १ सहस्र ९९ आरोपींचे गुन्हे मागे घेतले जातील, अशी घोषणा करून जनतेच्या जखमेवर मीठ चोळले नाही का ? कोरेगाव भीमा प्रकरण कोणामुळे घडले

फेसबूकचा ‘फास’ ओळखा !

महिला असल्याचे भासवून फेसबूकवर बनावट खाते सिद्ध करून १५ महिलांना गंडा घालणार्‍या धुळ्यातील भिकन पालांडे नावाच्या व्यक्तीला नुकतीच अटक करण्यात आली.

वृद्धाश्रमांची आवश्यकता का ?

राज्यामध्ये वृद्धाश्रमांची संख्या अल्प असल्यामुळे राज्यातील वृद्धांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकार वृद्धांची देखभाल करण्यामध्ये अपयशी ठरले आहे.

जीवावर उठणारा विकास काय कामाचा ?

‘ग्लोबल वॉर्मिंग’चे संकट डोक्यावर असतांना जीवसृष्टीच्या रक्षणासाठी सर्वत्र अधिकाधिक वृक्षांची लागवड करणे अत्यावश्यक असल्याचे मत जागतिक पर्यावरण तज्ञांनी मांडले आहे.

सिंहगडाची हरवलेली ऐतिहासिक प्रतिष्ठा ‘रज्जू मार्ग (रोपवे)’ परत आणेल ?

सिंहगड किल्ल्यावर जाण्यासाठी १.८ कि.मी. लांबीचा रज्जू मार्ग (रोपवे) उभारला जाणार आहे. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या गुंतवणूक परिषदेमध्ये सिंहगड किल्ल्यावरील रज्जू मार्गाची प्रतिकृती मांडण्यात आली होती.