साधू-संत येती घरा । तोचि दिवाळी दसरा ।।

‘दिवाळी हा आबालवृद्धांच्या आनंदाचा महास्रोत आहे. संतांचा आत्मानंद हा सर्वांत मोठा आनंद आहे. त्याची तुलना इतर आनंदाशी होऊ शकत नाही. संतांनी दिवाळीच्या आनंदाची तुलना आपल्या आत्मिक आणि आध्यात्मिक आनंदाशी केलेली आहे.

विजयादशमीच्या दिवशी करावयाची कृत्ये आणि शास्त्र !

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात, नियंत्रणात आलेल्या असतात, दाही दिशांतील दिक्भव, गण इत्यादींवर नियंत्रण आलेले असते, दाही दिशांवर विजय मिळालेला असतो.

आदिशक्तीचे योगमाया स्वरूप आणि तिने केलेला असुरांचा नाश !

‘योगमाया’ श्रीविष्णूच्या श्रीरामावतारात सीता बनून आली आणि रावणासुराच्या बंधनात राहिली. साक्षात् आदिशक्तीला एका असुराच्या बंधनात रहाण्याचे काय कारण ? ‘हीच तिची माया आहे’, जी कुणीही समजू शकत नाही.

आदिशक्तीने ‘रक्तबीज’ असुराला कसे मारले ?

कालीने रक्तबिजाच्या शरिरातून बाहेर पडणारे सर्व रक्त प्यायला आरंभ केला. देवीने रक्तबिजाच्या शरिराचे एक एक अंग कापायला आरंभ केला आणि देवी काली ते कापलेले अंग खात होती. त्यानंतर कालीने संपूर्ण रक्तबिजाला खाऊन टाकले.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील देवी स्कंदमातेचे कार्य (सरस्वती कथा)

श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी आदिशक्तीने मंथरेच्या माध्यमातून कैकयीच्या चांगल्या बुद्धीत पालट घडवून आणणे आणि त्यामुळे श्रीरामाचा राज्याभिषेक न होता त्याला वनवासाला जावे लागणे

शक्तिदेवता !

देवी चंद्रघण्टा हे पार्वतीचे विवाहित रूप आहे. देवी पार्वतीचा शिवाशी विवाह झाल्यावर तिने तिच्या मस्तकावर घंटा रूपात अलंकार म्हणून चंद्र धारण केला आहे. देवीचे चंद्रघण्टा हे रूप सदैव शस्त्रसज्ज असते. ती दशभुजा असून तिची कांती सुवर्णमय आहे. चंद्रघण्टा देवीकडे असलेल्या घंटेतून बाहेर पडणार्‍या चंड-ध्वनीला दानव सदैव घाबरतात.

त्रेतायुगात प्रभु श्रीरामाने रावणासुराच्या संहारासाठी केलेले नवरात्रीचे व्रत !

प्रभु श्रीराम नवरात्रीचे व्रत भावपूर्ण आचरत असतांना अष्टमीला आदिशक्तीने दर्शन देऊन ‘पुढील नवरात्रीत तुझे रावणासुराशी युद्ध चालू असतांना मी तुझ्या बाणात प्रवेश करीन आणि दशमीला रावणाचा वध होईल’, असे सांगणे

‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा नामजप सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर आणि ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲपवर उपलब्ध !

कुठलीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘सध्याच्या काळानुसार कुठल्या प्रकारचा नामजप करायचा’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून विविध नामजप महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ध्वनीमुद्रित केले आहेत.