अक्षय्य तृतीयेला करावयाच्या विविध कृतींमागील अध्यात्मशास्त्र

अक्षय्य तृतीया हा कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा प्रारंभदिन आहे. या तिथीला हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला.

साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त असलेली आणि सुख-समृद्धी प्रदान करणारी अक्षय्य तृतीया !

अक्षय (अक्षय्य) तृतीया साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. या दिवसाने एका कलहकालाचा अंत आणि दुसर्‍या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ, अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय (अक्षय्य) तृतीया या संपूर्ण दिवसाला मुहूर्त म्हणतात.

‘हनुमान जन्मोत्सव’ म्हणण्याऐवजी ‘हनुमान जयंती’ म्हणणेच योग्य !

‘हनुमान चिरंजीव असल्याने त्याची जयंती साजरी करण्याऐवजी जन्मोत्सव साजरा करा’, अशा आशयाची चौकट सध्या सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. याविषयी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी शास्त्रोक्त परिभाषेत सांगितलेले स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे.

हनुमान जयंती

काही पंचांगांच्या मते हनुमान जन्मतिथी ही आश्‍विन कृष्ण पक्ष चतुर्दशी आहे, तर काहींच्या मते चैत्र पौर्णिमा आहे. महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते.

‘प्रतीवर्षीप्रमाणे उत्तम रितीने पार पडलेला महाशिवरात्रीचा देखणा सोहळा !’ – प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये, पुणे

‘प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही घरातील महाशिवरात्र अत्यंत शांत चित्ताने पार पडली. प्रतीवर्षी मनुष्यबळ भरपूर असे; पण यंदा आम्हाला काळजी होती ती सेवकांची.

१ जानेवारीला नव्हे, तर भारतीय संस्कृतीनुसार नववर्षारंभ गुढीपाडव्याला साजरा करा !

आपला तरुणवर्ग मात्र पाश्‍चिमात्यांच्या भोगवादाला बळी पडून स्वतःच्या आयुष्याची राख-रांगोळी करायला निघाला आहे. क्षणिक सुखासाठी आपले भविष्य पुसण्यासाठी निघाला आहे.

चैतन्यदायिनी गुढी !

या दिवशी पृथ्वीवर प्रजापति लहरी वर्षांतून सर्वांत अधिक प्रमाणात येतात. गुढीकडून त्या ग्रहण केल्या जातात आणि वातावरणात प्रक्षेपित केल्या जातात. ईश्‍वराप्रती भाव असलेल्या जिवांना या लहरींचा अधिक लाभ होतो. 

गुढीपाडवा : ब्रह्मांडातील ब्रह्मतत्त्व पृथ्वीवर येण्याचा दिवस

महत्त्व : ‘सत्ययुगात या दिवशी ब्रह्मांडातील ब्रह्मतत्त्व प्रथमच निर्गुणातून निर्गुण-सगुण स्तरावर येऊन कार्यरत झाले आणि पृथ्वीवर आले.’ – कु. मधुरा भोसले ( ५.३.२००५, रात्री ९.३०)   

गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्त्व !

गुढीवर तांब्याचा कलश उपडा घालतात. सध्या काही जण स्टीलचे किंवा तांब्याचे पेले किंवा मडक्याच्या आकाराचे तत्सम काही भांडी गुढीवर ठेवत असल्याचे पहायला मिळते.

गुढीपाडव्याच्या दिवशी काढावयाच्या सात्त्विक रांगोळ्या

११ ठिपके : ११ ओळी, १२ ठिपके : १२ ओळी
संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ ‘देवतांची तत्त्वे आकृष्ट व प्रक्षेपित करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या’