‘स्टंटबाज’ तृप्ती देसाई

अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अपलाभ उठवून पोलीस यंत्रणेला विनाकारण नाडणार्‍या देसाईबाईंना प्रशासनानेच आता योग्य ते शासन केले पाहिजे, असे भाविकांना वाटल्यास चूक ते काय ?

रोहिंग्यांचे पुनर्वसन !

भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांचा प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न भारतातील आतापर्यंतच्या एकाही पक्षाच्या सरकारने केलेले नाही, ही वस्तूस्थिती आहे. विरोधी पक्षांत असतांना त्यांना देशाबाहेर काढण्याची मागणी करणारे सत्तेत असल्यावर मात्र कठोर आणि युद्धपातळीवर कृती करतांना दिसले नाहीत, हे जनता पहाते आहे.

न्यायाची प्रतीक्षा !

मंदिरे गाडून मशिदी उभारल्याने भक्त आणि ईश्‍वर यांच्यावर झालेला अन्याय दूर होण्यासाठी आज धर्मनिष्ठ हिंदू अन् अधिवक्ते प्राणपणाने लढत आहेत. हिंदूंची मंदिरे पुन्हा त्यांना मिळावीत, यासाठी सरकारने आता कृतीशील व्हावे, हीच हिंदूंची अपेक्षा !

स्वच्छ प्रशासन कधी ?

भ्रष्ट सरकारी अधिकार्‍यांची सामाजिक स्तरावर उघडपणे ‘छी-थू’ होईल, असे केले तरच भ्रष्टाचाराचे लांच्छन पुसण्याच्या दिशेने जाता येईल. आता ज्याप्रमाणे गुळमुळीत कारवाई होते, तेवढेच चालू रहाणार असेल, तर आपणच आपल्यासाठी मोठा खड्डा खोदत आहोत, हे निश्‍चित !

पुन्हा हिंदु राजेशाही !

लोकशाही स्थापन होऊन अवघी काही वर्षेच झाली असतांना आता नेपाळी हिंदूंनी देशात पुन्हा केवळ राजेशाही स्थापित करण्याची नव्हे, तर नेपाळला पुन्हा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे जनआंदोलने केली जात आहेत आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

आसुरी वृत्तीचा कोण ?

हिंदु धर्माचे मर्म लक्षात घेऊन आणि हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करूनच चित्रपट काढावा, अन्यथा हिंदू शांत बसणार नाहीत. धार्मिक इतिहासात फेरफार करणारे हेच हिंदूंच्या दृष्टीने दुष्प्रवृत्तीचे आहेत. अशांना वैध मार्गाने वठणीवर कसे आणायचे, याचे तंत्र हिंदूंना अवगत आहे, हेही संबंधितांनी जाणावे !

कलंकित लोकप्रतिनिधी !

भारतीय राजकारणाने किती खालचा स्तर गाठला आहे, ते मोजण्यासाठी कोणतीही फूटपट्टी नाही. नीतीमत्ता, आर्थिक अपहार, विरोधकांवर केलेल्या कुरघोड्या, स्वतःचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी केलेली कटकारस्थाने यांची कोणतीही लिखित नोंद नसेल, एवढे प्रसंग जनतेलाच ठाऊक असतील.

शिक्षणक्षेत्रात क्रांती हवी !

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले तरुण शिक्षक रणजितसिंह डिसले यांना प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल टीचर अवॉर्ड’ मिळाला आहे.

चित्रपटसृष्टीची कथा !

सर्व पहाता चित्रपटसृष्टीची शुद्धी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. समाजाच्या शुद्धीसाठी आणि त्याच्यावर सुसंस्कार करण्यासाठी हे अगत्याचे झाले आहे; कारण चित्रपट हे वैचारिक प्रबोधनाचे एक मोठे माध्यम आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे हिंदूंना वाटते.

भारतविरोधी ट्रूडो !

स्वत:च्या देशात मानसिक आजार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यसने, महिलांवरील हिंसा इत्यादी प्रश्‍नांविषयी ट्रूडो यांनी लक्ष दिल्यास कॅनडावासियांना साहाय्याचे ठरले असते; मात्र खलिस्तानवादाचे भूत डोक्यावर बसलेल्या ट्रूडोंना ते कळणार नाही. आता केंद्र सरकारने केवळ उत्तर देऊन नव्हे, तर ट्रूडो यांना खडसावून लगाम घालावा, ही अपेक्षा !