अमेरिकेतही गर्भपात हा गुन्‍हाच !

सध्‍या रुढीप्रिय झालेले अमेरिकेचे सर्वोच्‍च न्‍यायालय ‘समलैंगिक विवाह’, ‘गर्भपातासाठी अनुमती’ यांसारख्‍या प्रगतीशील निर्णयांचाही फेरविचार करू शकते. यावरून अमेरिकेत नीतीमत्ता, सुसंस्‍कृतपणा यांना ‘अच्‍छे दिन’ आले आहेत, असेच म्‍हणावे लागेल !

राष्ट्रपतीपदाची निवडणूक !

शासन किंवा प्रशासन यात निःस्पृह आणि निःस्वार्थ लोकांची वानवा आहे. हल्ली एखादे पद मिळाल्यास आणि त्या अनुषंगाने आलेले अधिकार मिळाल्यास त्याचा नेहमीच जनतेच्या हितासाठी वापर होतो, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. या पार्श्वभूमीवर मुर्मू यांनी केलेल्या स्वच्छतेच्या कृतीमुळे त्यांच्याविषयी लोकांच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत !

शारदापीठ भारताने कह्यात घ्यावे !

हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाची ही चिन्हे कशी पुसली जातील, यासाठीच पाक प्रयत्न करेल. हे लक्षात घेऊन आता भारतानेच शारदापीठाच्या जीर्णाेद्धारासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी आक्रमक पावले उचलून हा भागच कह्यात घेणे आवश्यक आहे !

आंधळं दळतय, कुत्रं पीठ खातय !

गोव्यात सध्या भूमी घोटाळा प्रकरण चांगलेच गाजत आहे. एकीकडे हा गदारोळ चालू असतांनाच पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याच्या संचालिका ब्लोसम मेडेरा यांना पदावरून हटवण्यात आले. त्यांना हटवणे आणि मुख्यमंत्र्यांनी या घोटाळ्यात काही शासकीय अधिकाऱ्यांचा हात असल्याचे सांगणे, याला योगायोग म्हणायचा का ?

फुकाचे बोल !

अशा प्रकारे विधाने करून हिंदूंना डिवचण्याचे काम मौलाना रझा यांनी केले आहे. भारतासह विदेशातही ‘मोदी मोदी’ नावाचा गजर होत असतांना ‘असा नेता मुसलमानांनाही मिळावा’, असे कदाचित् रझा यांना वाटत असेल, तर त्यांनीच सभेला आलेल्या सर्व मुसलमानांना घेऊन हिंदु व्हावे !

शिखांचे मौन !

काबूलच्या गुरुद्वारावर नूपुर शर्मा यांच्या विधानावरून आक्रमण झाले आहे, हे हिंदूंनी विसरू नये ! याचा एकाही इस्लामी देशाने निषेध किंवा विधान केलेले नाही. इस्लामिक स्टेटचा विरोध इस्लामी देश तसेच भारतातील मुसलमानही कधी करत नाहीत. त्यांनीही गुरुद्वारावरील आक्रमणाचा विरोध केलेला नाही, हे शिखांनी लक्षात घ्यायला हवे !

शांततेची परिभाषा काय ?

भारतात अनंत अडचणी, समस्या यांच्याशी झुंज देत समाधान मानणारी आणि शांततेत जीवन व्यतीत करणारी लाखो कुटुंबे आहेत. राष्ट्रीय स्तरावर विचार केल्यास जिहादी, मिशनरी आणि साम्यवादी, तसेच हिंदुविरोधी यांची अभद्र युती भारताची शांतता भंग करत आहेत. ही शांतता पुनर्प्रस्थापित करण्यासाठी हिंदु राष्ट्र हेच उत्तर आहे !

अन्नधान्याची नासाडी टाळा !

मुंबईत ६९ लाख किलो खाद्यपदार्थ प्रतिदिन कचऱ्यात फेकले जातात.नासाडी अशीच होत राहिली, तर वर्ष २०५० पर्यंत सद्यःस्थितीपेक्षा तिप्पट लोकांवर उपासमारीची वेळ ओढावेल !

‘अग्नीपथ’च्या विरोधातील षड्यंत्र !

राष्ट्रीय लोकदलाच्या वतीने संपूर्ण जुलै मासात उत्तरप्रदेशातील मुसलमानबहुल शहरांत अग्नीपथच्या विरोधात आंदोलनासाठी बैठका घेण्यात येणार आहेत. त्या होण्यापूर्वी सरकारने या देशद्रोही शक्तींचा बंदोबस्त केला पाहिजे !