संशोधनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला अनमोल ठेवा उपलब्ध करून देणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला छायाचित्रकांची (‘फोटो कॅमेर्‍यां’ची) आवश्यकता !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ वैज्ञानिक भाषेत आध्यात्मिक संशोधन करण्याचे एकमेवाद्वितीय आणि ऐतिहासिक कार्य करत आहे. या विश्‍वविद्यालयाचे काही साधक संतांच्या मार्गदर्शनानुसार विविध ठिकाणी प्रवास करून भारतीय संस्कृतीच्या अनमोल ठेव्याचा संग्रह करत आहेत.

साधकांनो, ‘जे घडते, ते भल्यासाठीच’, हे लक्षात ठेवून भगवंतावरील श्रद्धेने ‘कोरोना’सारख्या भयावह संकटाचा सामना करा !

‘सध्या ‘कोरोना’सारख्या भयावह संकटाने सार्‍या विश्‍वात थैमान घातले आहे. लक्षावधी लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला असून सहस्रावधी लोक मृत्यूमुखी पडले आहेत. सर्वसामान्य नागरिक कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत.

कोरोना महामारीची तीव्रता लक्षात घेऊन स्वत:सह कुटुंबियांचे रक्षण होण्यासाठी ‘कोरोना’विषयक सूचनांचे साधना म्हणून पालन करा !

जन्म-मृत्यू हे प्रारब्धानुसार निर्धारित असतात, तसेच संत आणि भविष्यवेत्ते यांनी वर्तवलेल्या भाकितानुसार आपत्काळात विविध आपत्तींमध्ये मोठी मनुष्यहानी होणार आहे. असे असले, तरी आपले योग्य क्रियमाण वापरणे हे ईश्‍वराला अपेक्षित आहे. आपत्तीविषयी वेळोवळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे ही साधना आहे.

‘कोरोना’चा वाढता संसर्ग लक्षात घेता ग्रीष्म ऋतूच्या पार्श्‍वभूमीवर आयुर्वेदाच्या दृष्टीने करण्याचे प्रतिबंधात्मक उपाय आणि पूर्वसिद्धता

नागरिकांनी आपली वात-पित्त-कफ प्रकृती, आपल्या प्रदेशाचे भौगोलिक हवामान आणि आजाराची तीव्रता लक्षात घेऊन वैद्यांच्या मार्गदर्शनानुसार औषधे घ्यावीत.

कोरोना महामारीची स्थिती गंभीर होत असतांना रुग्णालये, तपासणी केंद्रे, प्रयोगशाळा यांसारख्या ठिकाणी आलेले कटू अनुभव कळवा !

आपणांसही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस त्वरित कळवा.

साधकांसाठी सूचना आणि वाचकांना विनंती

आयकर विभागाने सर्वांना ३१ मार्च २०२१ पर्यंत पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करणे अनिवार्य केले होते. आता शासनाने लिंक करण्याची मुदत वाढवली असून ती ३० जून २०२१ करण्यात आली आहे.

आश्रम आणि जिल्हा साठ्यातील कापडी साहित्य पुढील वर्षभर सुस्थितीत रहावे, यासाठी ते ३०.४.२०२१ या दिवसापर्यंत उन्हात ठेवण्याचे नियोजन करा !

उन्हाळा चालू झाला असल्याने सर्व आश्रमसेवकांनी आश्रमातील अंथरुणे-पांघरुणे, गाद्या, उशा, बैठका, कनाती आदी कापडी साहित्य, तसेच लाकडी फर्निचर आवश्यकतेनुसार उन्हात ठेवण्याचे नियोजन करावे.

रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील आश्रमांसाठी ‘सी.सी.टी.व्ही.’च्या संदर्भातील साहित्य अर्पण करून धर्मकार्यात हातभार लावा !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा.

रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील आश्रमांसाठी ‘सी.सी.टी.व्ही.’च्या संदर्भातील साहित्य अर्पण करून धर्मकार्यात हातभार लावा !

‘सध्या रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील आश्रमांत ‘सी.सी.टी.व्ही.’च्या संदर्भातील पुढील साहित्याची तातडीने आवश्यकता आहे.