दैनिक ‘सनातन प्रभात’साठी लिखाण पाठवतांना केवळ नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण लिखाण थोडक्यात पाठवा !

केवळ ‘गोवा आवृत्ती’च चालू असल्याने साधकांचे सर्व लिखाण लगेचच प्रसिद्ध करता येणे शक्य होत नाही. दळण-वळण बंदीमुळे संकलन करणार्‍या साधकांची संख्याही अल्प आहे. यापुढे लिखाण पाठवतांना साधकांनी सूचनेतील सूत्रे लक्षात घेऊन ते पाठवावे.

‘स्वतःच्या चल आणि अचल संपत्तीचे ‘सत्पात्रे दान’ व्हावे’, या हेतूने ती सनातन संस्थेला दान करण्यास इच्छुक असल्यास आपल्या हयातीत अर्पण करा !

सनातन संस्थेचे कार्य पाहून समाजातील अनेक जण संस्थेला विविध स्वरूपांतील संपत्ती ‘सत्पात्रे दान’ म्हणून देण्याची इच्छा व्यक्त करतात. अशांसाठी आवाहन !

साधकांनो, समर्पितभावाने धर्मप्रसाराच्या कार्यात सहभागी होऊन संधीकालीन साधनेचा लाभ करून घ्या !

कोरोनामुळे गेले १० मास सनातन संस्थेचा धर्मप्रसार ‘ऑनलाईन’ माध्यमातून चालू होता. आता स्थिती पूर्ववत् होत असल्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन करून सनातनचे साधक पूर्वीप्रमाणे समाजात जाऊन धर्मप्रसार करणार आहेत.

सनातन-निर्मित सर्वांगस्पर्शी अनमोल आध्यात्मिक ग्रंथसंपदा सर्व भारतीय भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

विविध भारतीय भाषांचे आणि इंग्रजीचे ज्ञान असणारे साधक, वाचक अन् हितचिंतक यांना आध्यात्मिक ज्ञानदानाच्या कार्यात सहभागी होण्याची अमूल्य संधी !

संभाव्य आपत्काळाची तीव्रता लक्षात घेऊन इमारतीत तिसर्‍या माळ्याच्या वर असलेली सदनिका विकून तळ ते तिसर्‍या माळ्यावरील सदनिका घ्या !

साधकांनो, संभाव्य आपत्काळातून तरून जाण्यासाठी इथे दिल्याप्रमाणे भौतिक स्तरावरील सिद्धता करण्यासह आंतरिक साधना वाढवून भगवंतांचे भक्त बना ! 

भीषण आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वीच आवश्यकतेनुसार नेत्रतपासणी करून घ्या आणि अतिरिक्त उपनेत्र (चष्मा) बनवून घ्या !

ज्यांना डोळ्यांविषयी थोडासा जरी त्रास जाणवत असेल, तर त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष न करता तपासणी करून घ्यावी.

सनातनच्या आश्रमांमध्ये हात धुण्याच्या आणि कपडे धुण्याच्या साबणांची आवश्यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील साबणांची खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करण्यास इच्छुक असतील, त्यांनी संपर्क साधावा. अल्प मूल्यात किंवा विनामूल्य साबण देऊ शकत असल्यास तसेही कळवावे.

आपत्काळाच्या सिद्धतेसाठी नवीन अथवा जुनी बैलगाडी, घोडागाडी किंवा त्यांचे विविध भाग अर्पण अथवा अल्प मूल्यात कुणी देऊ शकत असल्यास त्याविषयी माहिती पाठवा !

आपत्काळात इंधनांचा तुटवडा भासेल. अशा वेळी प्रवास करणे, रुग्णाला वैद्यांकडे नेणे, सामान आणणे इ. कारणांसाठी वाहतुकीच्या पारंपरिक साधनांचा वापर करावा लागेल.

कोरोना लसीच्या रजिस्ट्रेशनसाठी अनोळखी लोकांनी माहिती मागितल्यास देऊ नये !

नागरिकांनी असे भ्रमणभाष संपर्क, लिंक किंवा लघुसंदेश यांना प्रतिसाद देऊ नये. ठाणे सिटी पोलिसांनी ट्वीट करून ही सूचना दिली आहे.

आश्रमातील शिलाईच्या विविध सेवांमध्ये सहभागी व्हा !

‘सनातनच्या विविध आश्रमांमध्ये पडदे, नेटलॉन, पायपुसणी, गोधड्या, आसंद्यांसाठी (खुर्च्यांसाठी) कव्हर आदी शिवण्याची सेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. या समवेतच आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्‍या साधकांसाठी सात्त्विक पद्धतीचे पोशाख शिवू इच्छिणार्‍या साधकांचीही आवश्यकता आहे.