श्री गणेशचतुर्थीच्या काळात गावाला जाण्यास इच्छुक असणाऱ्यांनी रेल्वे तिकिटाचे त्वरित आरक्षण करावे !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक – अक्षय्य तृतीया !

अंकात वाचा – अक्षय्य तृतीयेला करावयाच्या दानाचे महत्त्व, सण साजरा करण्याची पद्धत !

अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना डोळ्यांवर आवरण येत असल्याने आपला त्रास वाढू नये, यासाठी ते लगेच दूर करा !

आपण पंचज्ञानेंद्रियांपैकी डोळ्यांद्वारे बघून सर्वाधिक प्रमाणात सर्व गोष्टींचे आकलन करून घेत असल्याने ते दिसणाऱ्या दृश्यातील चांगल्या किंवा वाईट स्पंदनांनी भारित होतात.

३०.४.२०२२ या दिवशी असणाऱ्या खंडग्रास सूर्यग्रहणाविषयीची माहिती

चैत्र अमावास्या, ३०.४.२०२२, शनिवार या दिवशी असणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे वेधादी कोणतेही नियम पाळू नयेत.

१३.७.२०२२ या दिवशी होणाऱ्या ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’साठी ३०.४.२०२२ या दिवसापर्यंत सभागृह आरक्षित करा !

सनातनच्या गुरुपौर्णिमा महोत्सवांना लाभणारा जिज्ञासूंचा प्रतिसाद पहाता कार्यक्रमासाठी आतापासून सभागृहाचे आरक्षण करणे आवश्यक आहे. जिल्हासेवकांनी आपापल्या जिल्ह्यातील गुरुपौर्णिमांच्या सभागृहांचे आरक्षण ३०.४.२०२२ या दिवसापर्यंत करावे.

आश्रम आणि जिल्हा साठ्यातील कापडी साहित्य पुढील वर्षभर सुस्थितीत रहावे, यासाठी ते १५.५.२०२२ या दिवसापर्यंत उन्हात ठेवण्याचे नियोजन करा !

सर्व आश्रमसेवक आणि लेखासेवक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना !

साधकांनो, ‘सतत नकारात्मक विचार करण्याने आणि त्याविषयी इतरांशी वारंवार बोलण्याने मनावर नकारात्मकतेचा संस्कार होतो’, हे लक्षात घेऊन योग्य मार्गदर्शन, तसेच स्वयंसूचना घ्या !

‘काही वेळा साधक शारीरिक किंवा मानसिक समस्याचे ‘उपचार चालू असतांना त्याविषयी नकारात्मक विचार करत राहतात परिणामी मनातील नकारात्मक विचारांचे पोषण होऊन मनाची अस्थिरता वाढते.

सनातनची सर्वांगस्पर्शी ५ सहस्र संख्येची ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

प्रस्तुत सूची वाचून आपल्यापैकी कुणाचा अभ्यास असेल, तसेच आपल्या परिचितांपैकी या विषयांचे जाणकार असतील, तर त्यांनाही या ग्रंथसेवेत सहभागी होण्याविषयी आपण आवाहन करू शकता.

विद्यार्थी-साधकांनो, उन्हाळ्याच्या सुट्टीत चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

सेवांत साहाय्य करून धर्मकार्यात खारीचा वाटा उचलण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थी-साधकांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून आश्रमसेवकांशी संपर्क साधावा.

आध्यात्मिक स्तरावरील उपाय करत असतांना वाईट शक्तींचे त्रास दूर होत नसतील, तेव्हा ध्यान लावून निर्गुण स्तरावर उपाय करा !

वाईट शक्ती जेव्हा निर्गुण स्तरावर आक्रमण करत असतील, तेव्हा प्रत्यक्ष मुद्रा, न्यास आणि नामजप न करता काळ्या शक्तीने बाधित झालेल्या चक्रावर ध्यान लावून उपाय केल्यास लगेच परिणाम होतो; कारण तेव्हा आपले उपायसुद्धा निर्गुण स्तरावरील असतात.