हिंदु नववर्षारंभ विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २१ मार्चला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या १०,८७२ वाचकांचे शेष नूतनीकरण ३१.०३.२०२३ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

भारतभरातील ४,०९८ वाचकांचे जानेवारी मासापर्यंतचे, तर ६,६७४ वाचकांचे फेब्रुवारी , मार्च आणि एप्रिल मासांतील नूतनीकरण होणे शेष आहे.यावरून एकूण १०,८७२ वाचकांचे एप्रिल पर्यंतचे नूतनीकरण शेष असल्याचे लक्षात येईल.

श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती यांच्या निमित्ताने सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांचे अधिकाधिक वितरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.

देवद येथील मागणी पुरवठा विभागातील साठा पडताळणीची सेवा समयमर्यादेत पूर्ण व्हावी, यासाठी पुढील सूचनांचे पालन करा !

‘१० मार्च ते ५ एप्रिल २०२३ या कालावधीत देवद आश्रमात मागणी-पुरवठा विभागात सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ, छायाचित्रे, नामपट्ट्या आणि उत्पादने यांची प्रत्यक्ष साठा पडताळणी केली जाणार आहे. आर्थिक वर्षाच्या ताळेबंदाच्या दृष्टीने ३१.३.२०२३ पर्यंत वरील सेवा पूर्ण होणे अपेक्षित आहे.

अखिल मानवजातीला अध्यात्मजगताची नाविन्यपूर्ण ओळख करून देणार्‍या सनातन संस्थेच्या ध्वनी-चित्रीकरणाशी संबंधित सेवांमध्ये सहभागी होऊन धर्मकार्यात आपले योगदान द्या !

ध्वनी-चित्रीकरणाशी संबंधित सेवा करणार्‍यांच्या विविध सेवांतून जगाला अध्यात्मजगताची अभिनव ओळख होईल, तसेच ज्ञानाचा एक निराळा आनंदही अनुभवायला मिळेल.

सप्‍तर्षींच्‍या आज्ञेनुसार साधकांनी भ्रमणभाषवर बोलतांना ‘नमस्‍कार’ ऐवजी ‘हरि ॐ’ असे म्‍हणून संभाषण चालू करावे !

‘भ्रमणभाषवरून बोलतांना साधक ‘नमस्‍कार’ या शब्‍दाने संभाषणाला आरंभ करतात. यापुढे सप्‍तर्षींच्‍या आज्ञेनुसार भ्रमणभाषवरून बोलतांना सर्व साधकांनी ‘हरि ॐ’ असे म्‍हणून आपापसांतील बोलणे चालू करावे.