गुढीपाडवा आपापल्या घरी अत्यंत साधेपणाने साजरा करा ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

गुढीपाडवा आणि नववर्ष यांच्या स्वागतासाठी सज्ज होत असतांना या वर्षी आपले राज्य, तसेच संपूर्ण देश एका अभूतपूर्व संकटातून जात आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कळंबा कारागृहामधील ४५० बंदीवानांना तात्पुरता जामीन मिळण्याची शक्यता

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर राज्यासह देशातील मध्यवर्ती आणि जिल्हा कार्यालयात शिक्षा भोगणार्‍या बंदीवानांची गर्दी न्यून करण्यासाठी बंदीवानांना तात्पुरत्या जामीन (पॅरोल)वर सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

ईश्‍वरपूर येथे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरात भीतीचे वातावरण

शहरातील ४ जणांना कोराना झाल्याचे समजल्यावर शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली…

मालमत्ताकर, पाणीपट्टी ‘ऑनलाईन’ भरण्याचे महानगरपालिकेचे आवाहन

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ३१ मार्चपर्यंत ‘लॉकडाऊन’ घोषित केला असून या कालावधीत नागरिकांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने न्यूनतम संपर्कात येणे, त्याचप्रमाणे गर्दी टाळणे आवश्यक आहे.

नवी मुंबईत विदेशातून आलेल्या प्रवाशांसह २८५ जणांचे अलगीकरण

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विदेशी प्रवाशांसह अद्याप २८५ जणांचे अलगीकरण करण्यात आले आहे.

मंत्रालय, विधानभवन, आमदार निवास आदींसह सर्व शासकीय कार्यालयांचे निर्जंतुकीकरण होणार

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंत्रालय, विधानभवन, आमदार निवास, एस्.टी. महामंडळाच्या सर्व बसगाड्या यांसह सर्व शासकीय कार्यालये यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती………….

कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी पुढे ढकलली

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाची येथील जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये चालू असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे…….

पाटलीपुत्र येथे मशिदीमध्ये रहात असलेले १२ विदेशी मुसलमान पोलिसांच्या कह्यात

बिहारच्या पाटलीपुत्र या राजधानीमधील एका मशिदीमध्ये  विदेशी मुसलमान असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तेथे छापा मारून १२ विदेशी मुसलमानांना कह्यात घेतले आहे. हे सर्व जण १२ मार्च या दिवशी येथे पोचले होते; मात्र त्याविषयीची कोणतीच कल्पना पोलिसांना देण्यात आली नव्हती…..

संभाजीनगर येथे ‘सारी’ या व्याधीमुळे रुग्णाचा मृत्यू

येथील एका रुग्णाचे ‘सारी’ (सिव्हिअर अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स) या व्याधीमुळे २४ मार्च या दिवशी निधन झाले. सारी आणि कोरोना यांची लक्षणे समान आहेत.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या पोचली ५२६ वर

देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५२६ झाली असून आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक म्हणजे १०१ रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून त्यानंतर केरळमध्ये ९५ रुग्ण आढळले आहेत.