मराठी भाषेसाठी प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता ! – राज ठाकरे

मराठी भाषेसाठी प्रत्येक वेळेला नुसती आसवे गाळत बसण्यात अर्थ नसून प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केले. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसेच्या मराठी स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारूढ पुतळा हटवण्यासाठी रस्ते विकास महामंडळाकडून ग्रामस्थांना नोटीस

५० फूट उंच असलेला हा पुतळा राष्ट्रीय महामार्गावरून स्पष्ट दिसतो. तेथे ‘सेल्फी पॉईंट’ही निर्माण करण्यात आला आहे. सातारा शहराच्या वैभवात भर घालणारा हा पुतळा महामार्ग अतिक्रमण पथकाने २६ फेब्रुवारी या दिवशी काढण्यासाठी प्रयत्न चालू केले.

‘अहमदनगर’चे नामांतर ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर’ करा !

राज्यात सध्या औरंगाबाद नामांतरणाचे सूत्र ऐरणीवर असतांना अहमदनगरचे नामांतर करून शहराला ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर’ असे नाव देण्याची मागणी होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी केली आहे.

लोकांनी थुंकू नये; म्हणून जिन्यात लावलेल्या हिंदु देवतांच्या प्रतिमा असलेल्या फरशा तात्काळ काढा ! – श्रीराम सेनेचे निवेदन

एका इमारतीत असलेल्या कॅनरा बँकेच्या शाखेत जातांना जिन्यात लोकांनी थुंकू नये म्हणून हिंदु देवतांच्या प्रतिमा असलेल्या फरशा बसवण्यात आल्या आहेत. यामुळे देवतांची विटंबना होत आहे आणि समस्त हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत….

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या सभेत ४३७ कोटी रुपयांची विकासकामे संमत

यात विविध विकासकामांच्या व्ययासमवेत तरतूद वर्गीकरण, अवलोकनाच्या विषयासह विविध विकासविषयक कामांना अनुमाने ४३७ कोटी रुपयांच्या व्ययास स्थायी समितीने संमती दिली आहे.

जपानमध्ये वाढत्या आत्महत्यांमुळे एकाकीपणावर मात करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना !

जपानसारख्या अत्यंत प्रगत अशा वैज्ञानिक देशातील नागरिक मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करतात ?

मंत्री संजय राठोड यांना तात्काळ अटक करा ! – भाजपा महिला मोर्चाची तीव्र निदर्शने

भाजप महिला मोर्चाच्या  अध्यक्षा गायत्री राऊत यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करून रस्ता बंद आंदोलन करण्यात आले.

अमेरिकेत शिवराज्याभिषेक ; शिवजयंतीनिमित्त मराठी बांधवांकडून महानाट्य

DARHCT आणि CTMM चमूने अख्खे शिवचरित्र ३५ मिनिटांत नाट्य स्वरूपात प्रस्तुत केले.

वर्ष २०२० आणि २०२१ चे ‘लोक हिंद गौरव’ पुरस्कार घोषित

२७ फेब्रुवारी या दिवशी शहापूर येथील कुमार गार्डन सभागृह येथे सकाळी १० वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार असून दोन्ही वर्षांचे पुरस्कार एकत्र देण्यात येणार आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजाची दिशाभूल करू नये ! – शिवसेनेचा पत्रकाच्या माध्यमातून आरोप 

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजास गृहीत धरून त्यांची दिशाभूल करू नये.