Goa Loksabha Elections 2024 : पणजी येथे श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेत भाजपच्या नेत्यांचा प्रचाराला प्रारंभ !

या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार सदानंद शेट तानावडे, उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याच्या उमेदवार सौ. पल्लवी धेंपे, काही मंत्री आणि पक्षाचे अन्य पदाधिकारी, तसेच मगोचे श्री. सुदिन ढवळीकर यांची उपस्थिती होती.

वाशी आणि सानपाडा येथे शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार असलेल्या जयंतीनिमित्त २८ मार्च या दिवशी वाशी, तुर्भे, सानपाडा परिसरात विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कोणत्याच संशयितांच्या विरोधात ठोस पुरावा उपलब्ध नसल्याने सर्वांची निर्दोष मुक्तता करावी ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, मुंबई उच्च न्यायालय

इतिहासात पहिल्यांदाच असे झाले असेल की, ‘सीबीआय’ने त्यांच्याच पोलीस अधिकार्‍यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला. यातून हेच सिद्ध होते की, जे संशयित आहेत त्यांना जाणीवपूर्वक अडकवण्यासाठीच आणि सनातन संस्थेला त्यात गोवण्याच्या दृष्टीनेच हे अन्वेषण करण्यात आले.

पुणे महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे शनिवारवाड्याची दुरवस्था !

मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारा शनिवारवाडा पुणे महापालिका सुस्थितीत ठेवू न शकणे, हे इतिहासाचा अभिमान नसल्याचेच द्योतक !

Pakistan Suicide Attack : पाकिस्तानात आत्मघातकी आक्रमणात ५ चिनी अभियंते ठार

चीन भारताविरुद्ध पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करतो. आता हेच आतंकवादी त्याच्या मुळावर उठले आहेत. त्यामुळे चीनने जे पेरले आहे, तेच उगवले आहे !

खंडणीसाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण आणि हत्या करणार्‍या २ धर्मांधांना अटक !

धर्मांधांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक नाही, हेच या घटनेतून सिद्ध होते. पोलीस त्यांचा धाक केव्हा निर्माण करणार ?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची नावे २८ मार्चला घोषित करणार ! – अजित पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९९ टक्के जागा अंतिम झाल्या आहेत. २८ मार्च या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची नावे घोषित करण्यात येणार आहेत

मुंबईत तक्रार केल्यावर लाओस देशातील तिघांविरोधात गुन्हा नोंद !

थायलंडमध्ये चांगल्या वेतनाचे आमीष दाखवून भारतातील तरुणांना लाओस देशात बेकायदेशिररित्या नेण्यात आले. तेथील बेकायदेशीर कॉलसेंटरमध्ये काम करण्यास त्यांना भाग पाडण्यात आले.

पुणे येथे आधुनिक वैद्याची १ कोटी रुपयांची फसवणूक !

ऑनलाईन पद्धतीने केली जाणारी फसवणूक रोखणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरत आहे ! वाढत्या सायबर चोरीवर पोलीस कधी नियंत्रण आणणार ?

होळीच्या कारणावरून धाराशिवमध्ये हिंदु-मुसलमान यांच्यात झालेल्या दगडफेकीत ५ घायाळ !

दंगल कोण घडवते ? वातावरण खराब कोण करते ? हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे संबंधित दंगलखोरांवर पोलीस कारवाई का करत नाहीत ?