श्रीक्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळाचालक यांच्या वतीने ‘देशी गोवंश बचाव जनआंदोलन’ !

श्रीक्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळाचालक यांच्या वतीने देशी गोवंशियांच्या रक्षणासाठी उपोषण करणार असून या आंदोलनाला ‘देशी गोवंश बचाव जनआंदोलन’, असे नाव देण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी आता लोकलगाडीत वेगळ्या डब्याची सुविधा !

वाढत्या गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेतून प्रवास करणे अशक्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता लोकलगाड्यांमध्ये केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासंबंधी कार्यादेश काढण्यात आला आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दोंडाईचा (धुळे) येथे धर्मांधांकडून छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना; नंदुरबार येथे ईदच्या मिरवणुकीत धर्मांधांची दंगल !

ईदची मिरवणूक चालू असतांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर धर्मांधांनी पेटते फटाके फेकले. यामुळे तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले.

बारव्हा (जिल्हा भंडारा) येथे विसर्जन मिरवणूक पहातांना छत कोसळल्याने ४० महिला घायाळ !

जिल्ह्यातील बारव्हा या गावात सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूक पहाण्यासाठी मोठ्या संख्येने लोक छतावर उभे असतांना अचानक एक छत कोसळले. या अपघातात ३०-४० महिला घायाळ झाल्या असून त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी पाठवण्यात आले.

अपेक्षित सुरक्षेच्या अभावी गोवा शासनाच्या ७० टक्के संकेतस्थळांना सायबर आक्रमणाचा धोका

गोवा शासन ‘इझ ऑफ डुईंग बिझनेस’ (व्यवसाय सुलभरित्या करता येणे) किंवा ‘डिजिटल’ कार्यप्रणाली यांना प्रोत्साहन देत असली, तरी अपेक्षित सुरक्षेच्या अभावी शासनाच्या ७० टक्के संकेतस्थळांना सायबर आक्रमणाचा धोका आहे.

सासोली येथे ग्रामस्थांच्या सामाईक भूमीत बेसुमार वृक्षतोड

संबंधितांवर केवळ दंडात्मक कारवाईचा वन विभागाचा प्रयत्न

भरत गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता !

भरत गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आणि ते मुख्यमंत्री झाल्यानंतर गेली…

‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, पर्यटन स्थळे ‘शून्य कचरा’ करण्याचा निर्धार !

‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ या राज्यस्तरीय अभियानाचा १९ सप्टेंबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. गिरगाव चौपाटी येथे स्वच्छता कर्मचार्‍यांसह स्वच्छता …

आळंदी (पुणे) येथे ७ सहस्र श्री गणेशमूर्तींचे संकलन

 ईदच्या दिवशी प्राण्यांना कापून ते रक्त नद्या, नाले किंवा इतरत्र सोडले जाते त्या वेळी नदी प्रदूषित होत नाही का ?

वारजे, कर्वेनगर (पुणे) येथे हौदामध्ये ४ सहस्र २३१ मूर्ती, ७३ लोखंडी टाक्यांमध्ये ३७ सहस्र ७५० मूर्तींचे विसर्जन !

कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्या श्री गणेशमूर्ती काढण्यासाठी जेव्हा शासकीय कर्मचारी त्यात उतरतात, तेव्हा त्यांच्या पायाखाली अनेक गणेशमूर्ती अवयव भंग होऊन त्यांची विटंबना होते. हे अत्यंत गंभीर असून हिंदूंच्या धर्मश्रद्धा दुखावणारे आहे.