संताजी महाराज जगनाडे यांनी लिहिलेल्या अभंगाची वही भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या संग्रहात जमा

संताजी महाराज जगनाडे यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे इसवी सन १७३१ मध्ये अभंग लिहिलेली वही पंढरपूर संशोधन मंडळाला मिळाली.

‘वन्दे मातरम्’वरून राजकारण करण्यापेक्षा त्यासाठी कायदा करा ! – उद्धव ठाकरे

‘वन्दे मातरम्’वरून राजकारण करण्यापेक्षा त्यासाठी कायदा करा. ‘वन्दे मातरम्’ म्हणावेच लागेल असे भाजपचे नेते म्हणतात आणि ‘वन्दे मातरम्’ न म्हणणार्‍यांना देशद्रोही म्हटले जाऊ शकत नाही, असे भाजपचेच काही नेते म्हणतात.

न्यायालयीन कामकाजात मराठीच्या वापरासाठी अधिनियमाच्या प्रचलित कार्यपद्धतीत सुधारणा करण्यास अभ्यासगट स्थापन

राज्यात न्यायालयीन कामकाजात मराठीचा सक्षम वापर करणे, तसेच केंद्र अन् राज्य अधिनियमाच्या मराठी प्रती अद्ययावत करणे अन् प्रचलित कार्यपद्धतीत सुधारणा करणे यांकरता अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे.

प्रतिदिन एखाद्या गरीब रुग्णाचा विनामूल्य उपचार करावा ! – डॉ. प्रवीण तोगाडिया

डॉ. तोगाडिया म्हणाले, ‘‘देशातील २९ टक्के जनतेपर्यंतच सरकारी आरोग्य सेवा पोहोचते. ‘इंडिया हेल्थ लाइन’कडून प्रतिदिन किमान एक रुग्ण डॉक्टरांकडे पाठवण्यात येणार आहे.

मुलांसाठी वेळ द्या, संवाद साधा आणि अपयशातही पाठराखण करा ! – मान्यवरांचे मत

महाराष्ट्र साहित्य परिषद, शब्दांगण आणि रोहन प्रकाशन आयोजित ‘शोध अस्वस्थतेचा – मुलांच्या आत्महत्येचा’ विषयावरील परिसंवाद

जळगाव येथील श्री विठ्ठल मंदिरात २० सहस्र रुपयांच्या दागिन्यांची चोरी

शहरातील मु.जे. महाविद्यालय परिसरातील श्री विठ्ठल मंदिरातील श्री विठ्ठल-रखुमाईच्या मुकुटासह २० सहस्र रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली.

हिंदु जनजागृती समितीकडून कर्नाटकातील शिवमोग्गा आणि उडुपी येथील धर्मप्रेमी अन् प्रशासकीय अधिकारी यांना राखी बांधून धर्मबंधुत्व जागृत करण्यात आले

रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, शिकारीपूर येथील पोलीस उपअधीक्षक, तसेच सागर आणि तीर्थहळ्ळी येथील तहसीलदार यांना राखी बांधण्यात आली.

भाजप ‘३५ ए’ कलमावरून ‘जम्मू विरुद्ध काश्मीर’ असा वाद निर्माण करत आहे ! – ओमर अब्दुल्ला यांचा आरोप

जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेले ‘३५ ए’ हे कलम रहित झाल्यास तेथील कायदे समाप्त होतील. त्यांनतर जम्मू आणि काश्मीर येथे बाहेरील लोकांना भूमी विकत घेता येईल, त्यांना सरकारी नोकर्‍या मिळवता येतील.

मुख्य आरोपी मैनुद्दीन मुल्ला याला पिंपरी-चिंचवड येथे अटक !

वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतील कोट्यवधी रुपयांच्या चोरी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मैनुद्दीन मुल्ला याला गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी १३ ऑगस्टला पहाटे पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे अटक केली.

चीनच्या हेकेखोरपणाला उत्तर देण्यासाठी नागपूर ‘मेट्रो’च्या डब्यांचे चिनी आस्थापनाला दिलेले कंत्राट त्वरित रहित करा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

चीनच्या हेकेखोरपणाला उत्तर देण्यासाठी नागपूर ‘मेट्रो’च्या डब्यांचे चिनी आस्थापनाला दिलेले कंत्राट तात्काळ रहित करावे आणि चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालावा


Multi Language |Offline reading | PDF