कोरोना विषाणूचा जन्म चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत झाला ! – क्रिस्टोफर व्रे, संचालक, एफ्.बी.आय

कोरोनाच्या उत्पत्तीविषयी आम्ही गेल्या काही वर्षांपासून संशोधन करत आहोत. यात आम्ही जी निरीक्षणे नोंदवली आहेत, त्यानुसार कोरोना विषाणूचा जन्म चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतून झाल्याची दाट शक्यता आहे, असा दावा अमेरिकेच्या गुप्तचर अन्वेषण विभागाचे (एफ्.बी.आय.चे) संचालक क्रिस्टोफर व्रे यांनी केला.

भारत आणि चीन यांनी रशियाला अणूबाँबचा वापर करण्यापासून रोखणे महत्त्वाचे ! – अमेरिका

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी स्पष्ट केले होते की, चीन आणि भारत यांच्यामुळेच रशियाने युक्रेनवर अणूबाँबद्वारे आक्रमण केलेले नाही.

व्हिडिओ गेम खेळण्यास थांबवल्याने विद्यार्थ्याकडून शिक्षिकेला अमानुष मारहाण !

विद्यार्थी वर्गात व्हिडिओ गेम खेळत असल्याने शिक्षिकेने ते थांबवण्यास सांगितल्यावर त्याला राग आला आणि त्यातून त्याने शिक्षिकेला मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी विद्यार्थ्याला अटक केली आहे.

राष्ट्राध्यक्ष बनल्यास शत्रूराष्ट्रांना देण्यात येणारे साहाय्य बंद करू ! – निक्की हेली

मी राष्ट्राध्यक्ष बनल्यास अमेरिकेच्या शत्रूंना करण्यात येणारे आर्थिक साहाय्य पूर्णपणे थांबवेन, अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी स्वतःच्या नावाची घोषणा करणार्‍या भारतीय वंशाच्या नेत्या निक्की हेली यांनी केली आहे.

तिसरे महायुद्ध झाल्यास जग ३ गटांत विभागले जाईल !

रशिया-युक्रेन युद्ध एक वर्षानंतरही अद्याप चालूच असल्याने जग तिसर्‍या महायुद्धाकडे वेगाने सरकत असल्याचे मत अनेक संरक्षण तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. असे झाल्यास इच्छा असो वा नसो, अनेक देश या महायुद्धाच्या खाईत लोटले जातील.

पाकिस्तानच आतंकवाद्यांचा सुरक्षित आश्रयदाता ! – भारताचे संयुक्त राष्ट्रांत खडे बोल

वारंवार अशी दिशाहीन सूत्रे मांडून महासभेचा अमूल्य वेळ घेत असल्याविषयी पाकला सभेतून बहिष्कृत करण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रांवर दबाव आणला पाहिजे !

आता अमेरिकेच्या हवाई परिसरात दिसला हेरगिरी करणारा फुगा !

हा फुगा ५० सहस्र फूट उंचीवर असल्याची माहिती मिळाली असली, तरी अमेरिकी अधिकारी आणि हवाई वाहतूक नियंत्रण विभाग यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

(म्हणे) ‘भारतात सर्व जण उपाशी मरत आहेत, तू तेथे परत का जात नाहीस ?’- अमेरिकी लेखिका एन्. कोल्टर

ही आहे अमेरिकी लोकांची मानसिकता ! असे अमेरिकी भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असल्याचा कांगावा करत असतात !

चीनचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि युरोप यांना भारताची आवश्यकता !

चीनचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि युरोप यांना आता भारताची आवश्यकता भासू लागली आहे; मात्र भारताला त्रास देण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय देश यांनी आतापर्यंत किती प्रयत्न केले ?, हे भारतियांनी कधी विसरू नये !

अमेरिकेला भारतीय वंशाचे राष्ट्राध्यक्ष मिळण्याची शक्यता !

भारतीय वंशाच्या निक्की हेली यांनी रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारासाठीची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही यावर दावा केला आहे. त्यामुळे आता रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होण्यासाठी ट्रम्प आणि निक्की यांच्यात लढत होणार आहे.