अमेरिकेतील आणखी एक बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर !
‘ब्लूमबर्ग’ या संस्थेच्या मते फर्स्ट रिपब्लिक बँकेच्या शेअरच्या मूल्यांमध्ये ६१.८३ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
‘ब्लूमबर्ग’ या संस्थेच्या मते फर्स्ट रिपब्लिक बँकेच्या शेअरच्या मूल्यांमध्ये ६१.८३ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
अमेरिकेने तिच्या संसदेत एक विधेयक संमत करून ‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे’, असे म्हटले आहे. भारतातील अरुणाचल प्रदेश आणि चीन यांच्यामधील मॅकमोहन रेषेला आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून अमेरिकेने या विधेयकाद्वारे मान्यता दिली आहे.
तैवानवरून अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव वाढत चालला असून येत्या काळात त्याचे युद्धात रूपांतर होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ‘फोर्ब्स’च्या एका अहवालानुसार, चीनच्या तुलनेत अमेरिकेचे आक्रमण करण्याचे सामर्थ्य अल्प झाले आहे.
सिलिकॉन व्हॅली आणि सिग्नेचर बँक दिवाळखोर झाल्यानंतरही अमेरिकेतील बँकींग प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केला.
‘आपल्या सौरमालेत पाणी कुठून आले ?’, हा अंतराळाशी संबंधित अनेक प्रश्नांपैकी हा एक प्रश्न आहे, ज्याचे उत्तर वैज्ञानिक शोधत आहेत. नुकतीच शास्त्रज्ञांनी एक तारा प्रणाली शोधून काढली आहे, ज्यामुळे आपल्याला या रहस्याची कल्पना येऊ शकते.
अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली बँकेपाठोपाठ आता सिग्नेचर बँकेला टाळे ठोकण्यात आले आहे. सिग्नेचर ही न्यूयॉर्कमधील एक प्रादेशिक बँक आहे. सप्टेंबर २०२२ पर्यंत सिग्नेचर बँकेच्या धनसंचयापैकी एक चतुर्थांश वाटा हा ‘क्रिप्टो करन्सी’ अर्थात् अभासी चलनाचा होता.
९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय चित्रपट ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ या गाण्याला मूळ गाण्याच्या श्रेणीत ‘सर्वोत्कृष्ट गाणे’ म्हणून पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी या गाण्याला ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार मिळाला होता.
पाकिस्तान सरकारने देशात अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य आणावे, अशा शब्दांत अमेरिकन संसदेच्या विदेश व्यवहार समितीचे वरिष्ठ सदस्य ब्रॅड शर्मन यांनी पाकला सुनावले. ब्रॅड शर्मन यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आम्ही पाकिस्तानमध्ये वाढत्या हिंसाचाराच्या घटनांविषयी चिंतित आहोत.
वर्ष २००८ मधील आर्थिक मंदीनंतर सिलिकॉन व्हॅली ही अमेरिकेतील बुडालेली सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक आहे. सिलिकॉन बँकेची स्थापना वर्ष १९८३ मध्ये बिल बिगरस्टफ आणि रॉबर्ट मेडेरिस यांनी कॅलिफॉर्निया येथे केली.
आतंकवादाच्या सर्व प्रकारांचा निषेध केला पाहिजे. आतंकवादाच्या कोणत्याही कृत्याचे समर्थन होऊच शकत नाही. पाकिस्तानकडे बोट दाखवत कंबोज म्हणाल्या की, आतंकवाद्यांना आश्रय देणारे देश ओळखले पाहिजेत. त्यांना त्यांच्या कृतीसाठी उत्तरदायी धरले पाहिजे.