अमेरिकेतील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याचा प्रस्ताव !

भारताशी व्यापारवृद्धीसाठी हिंदी भाषा येणे अनिवार्य आहे. त्यामुळे अमेरिकेतील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याचा प्रस्ताव अमेरिकेतील ‘इंडियन अमेरिकन इम्पेक्ट’ आणि ‘एशिया सोसायटी’ या संघटनांच्या १०० लोकांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासमोर ठेवला आहे.

अमेरिकी विश्‍वविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या रंगावर आधारित प्रवेश दिला जाणार नाही !

अमेरिकेत वर्णद्वेषाची अनेक प्रकरणे पुढे येत आहेत. तेथील विश्‍वविद्यालयांमध्येही वर्णद्वेषी प्रकार घडतात. अमेरिकेने भारतासह अन्य देशांच्या अंतर्गत गोष्टींत नाक खुपसण्यापेक्षा तिच्या देशांतील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत ! यातच त्या देशाचे भले होईल !

मेक्सिको देशात तीव्र उष्णतेमुळे १०० जण मृत्यूमुखी

अतिसारामुळे या लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे देशातील काही ठिकाणांचे तापमान ५० डिग्री सेल्सियसच्या पुढे गेले आहे.

न्यूयॉर्कमधील शाळांना मिळणार दिवाळीची सुट्टी !

न्यूयॉर्कचे महापौर एरिक अ‍ॅडम्स यांनी ही माहिती दिली. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर सर्व शाळांमध्ये याविषयीचा आदेश लागू होणार आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना विशेष ‘टी शर्ट’ भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक विशेष ‘टी शर्ट’ भेट दिला आहे. या टी शर्टवर एक खास संदेश लिहिला आहे. बायडेन यांनी दिलेल्या टी शर्टवर लिहिले आहे, ‘भविष्य ‘एआय’चे आहे, इंडिया अँड अमेरिका.’

प्रसिद्ध हॉलिवूड गायिका मेरी मिलबेन यांनी गायले भारताचे राष्ट्रगीत !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ४ दिवसांचा अमेरिका दौरा समाप्त झाला असून ते आता इजिप्तच्या दौर्‍यावर गेले आहेत. तत्पूर्वी अमेरिकेत पंतप्रधान मोदी यांनी रोनाल्ड रेगन सेंटरमध्ये अनिवासी भारतियांना संबोधित केले.

(म्हणे) ‘पंतप्रधान मोदी यांच्याशी भारतातील मुसलमानांच्या सुरक्षेवर चर्चा करा ! – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

भारताच्या अंतर्गत सूत्रांवर चर्चा करण्याचा अधिकार कोणत्याच देशाला आणि त्यांच्या प्रमुखांना नाही, हे ओबामा यांना ठाऊक नाही का ? ‘पंतप्रधान मोदी यांनी बायडेन यांच्याशी अमेरिकेतील अश्‍वेतांवरील अत्याचारांविषयी चर्चा करावी’, असे भारताने कधी म्हटले आहे का ?

भारतात जात, पंथ, लिंग असा कोणताही भेदभाव केला जात नाही ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांचा अमेरिका दौरा

पाकिस्तानने त्याच्या भूमीचा वापर आतंकवादी आक्रमणासाठी होणार नाही, याची काळजी घ्यावी !

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे संयुक्त निवेदन !

अमेरिकेत पंतप्रधान मोदी यांना काही संघटनांकडून करण्यात येत आहे विरोध !

न्यूयॉर्क येथील ‘देसीस रायझिंग अप अँड मुव्हिंग’, ‘हिंदुज फॉर ह्युमन राइट्स’, ‘क्वीन्स अगेन्स्ट हिंदू फॅसिझम्’ आणि ‘वर्ल्ड सिख पार्लिमेंट’ अशा संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे.