चीनकडून देहलीपर्यंत मारा करू शकणार्‍या अण्वस्त्रावाहू क्षेपणास्त्राची चाचणी 

चीनने ‘डीएफ्-२६’ आणि ‘डीएफ्-१६’ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. ही क्षेपणास्त्रे देहलीपर्यंत मारा करू शकतात. ‘डीएफ्-२६’ हे क्षेपणास्त्र ४ सहस्र किलोमीटरपर्यंत मारा करू शकते.

चीनकडून आता बियाण्यांद्वारे विविध देशांवर आक्रमण करण्याचे षड्यंत्र

चीनकडून भारत, जपान, कॅनडा, अमेरिका आणि इंग्लंड येथील नागरिकांना कुरिअरच्या माध्यमातून बियाण्यांची पाकिटे मिळाली आहेत. याद्वारे चीनचा कोरोनाप्रमाणे बियाण्यांद्वारे विषाणू पसरवण्याचा कट असल्याचा संशय या देशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

चीनमध्‍ये आणखी एका विषाणूमुळे ७ जणांचा मृत्‍यू, तर ६० जणांना लागण

जगभरात कोरोनाच्‍या संसर्गाचा धोका कायम असतांनाच आता चीनमध्‍ये आणखी एका म्‍हणजे ‘एस्‌एफ्‌टीएस्’ विषाणूचा संसर्ग होत असल्‍याचे समोर येत आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत ७ जणांचा मृत्‍यू झाला असून ६० जणांना त्‍याची लागण झाली आहे.

वुहानमध्‍ये कोरोनामुक्‍त झालेल्‍या ९० टक्‍के रुग्‍णांच्‍या फुफ्‍फुसावर गंभीर परिणाम

जेथे कोरोनाचा उगम झाला, त्‍या वुहानमध्‍ये कोरोनामुक्‍त झालेल्‍या ९० टक्‍के रुग्‍णांच्‍या फुफ्‍फुसावर गंभीर परिणाम झाल्‍याचे एका अभ्‍यासात समोर आले आहे.