श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे १३ जुलैला त्यागपत्र देणार !

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर आंदोलनकर्त्यांनी नियंत्रण मिळवल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात पैसे सापडले आहेत.

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे निवासस्थानातून पलायन !

श्रीलंकेतील नागरिकांनी येथील राष्ट्रपतींच्या निवासस्थानी प्रचंड मोठ्या संख्येने कूच केल्यानंतर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी त्यांचे निवास सोडून पलायन केले.

श्रीलंकेतील ६० लाख लोकांना भेडसावत आहे अन्न असुरक्षितता !

श्रीलंकेतील १० पैकी ३ कुटुंबांना ‘आमच्या पुढील भोजनाची व्यवस्था  कुठून केली जाईल’, याविषयी अनिश्‍चित असतात. सुमारे ६० लाख नागरिकांना भोजनाची व्यवस्था करणे कठीण जात आहे.

श्रीलंकेच्या नौदलाकडून १२ भारतीय मासेमारांना अटक

श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीत असतांना भारत मोठ्या प्रमाणात त्याला साहाय्य करत आहे. दुसरीकडे श्रीलंकेने मात्र भारतीय मासेमारांवर अशा प्रकारे कारवाई करणे, हा भारताचा विश्‍वासघात !

श्रीलंकेतील प्रांतीय निवडणुका होण्यासाठी भारताने हस्तक्षेप करावा !

श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्यांकांच्या एका समुहाने भारताकडे आग्रह धरला आहे की, त्याने श्रीलंकेतील ९ प्रांतांमधील प्रलंबित निवडणुका होण्यासाठी हस्तक्षेप करावा.

भारताकडून मिळालेले आर्थिक साहाय्य हे दान नसून त्याची परतफेड करावी लागेल ! – श्रीलंकेचे पंतप्रधान

विक्रमसिंघे म्हणाले की, आम्ही भारताकडून ४ बिलियन अमेरिकी डॉलरचे (३१ सहस्र कोटी रुपयांहून अधिकचे) कर्ज घेतले आहे. आम्ही भारताकडे अधिक कर्ज देण्याचे आवाहनही केले आहे; परंतु भारत अधिक कर्ज देऊ शकणार नाही.

दिवाळखोर श्रीलंकेतील सरकारी कार्यालये आणि शाळा होणार बंद !

आर्थिक डबघाईला गेलेल्या श्रीलंकेने पुढील आठवड्यापासून त्याची सरकारी कार्यालये, तसेच शाळा बंद करण्याची घोषणा केली आहे. इंधन वाचवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

श्रीलंकेत पेट्रोल ४२० रुपये, तर डिझेल ४०० रुपये प्रति लिटर !

श्रीलंकेत पेट्रोल ४२० रुपये, तर डिझेल ४०० रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. श्रीलंकेत १९ एप्रिलनंतर इंधनाच्या दरात झालेली ही दुसरी वाढ आहे. श्रीलंकेवर आर्थिक संकट ओढवले असून महागाईत प्रचंड वाढ झाली आहे.

श्रीलंकेत केवळ एक दिवसाचा पेट्रोल साठा शिल्लक !

आर्थिक डबघाईच्या दिशेने झपाट्याने जात असलेल्या श्रीलंकेत आता केवळ एक दिवस पुरेल इतकाच पेट्रोल साठा शिल्लक आहे, अशी माहिती पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी दिली.

श्रीलंकेतील स्थिती अधिक बिकट होईल ! – पंतप्रधान विक्रमसिंघे

श्रीलंकेला इंधनाचा तुटवडा भेडसावत असून गेल्या काही आठवड्यांमध्ये खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. यावरून श्रीलंकन जनतेकडून अनेक हिंसात्मक कारवाया करण्यात येत आहेत.