पिंपरी (पुणे) येथे घरगुती गॅसची चोरी करणार्‍या टोळीला अटक, ३८१ सिलिंडर जप्त

पिंपरी-चिंचवड शहरात घरगुती गॅसची चोरी करणार्‍या टोळीला सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी कारवाईमध्ये एकूण ३८१ गॅसच्या रिकाम्या आणि भरलेल्या टाक्या जप्त करण्यात आल्या..

राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात शिवजयंती ‘स्वराज्यदिन’ म्हणून साजरी करण्यात येईल !

माझ्या अखत्यारीत येणार्‍या महाविद्यालयांत पुढील वर्षापासून शिवजयंती ही प्रत्येक महाविद्यालयात ‘स्वराज्यदिन’ म्हणून साजरी केली जाईल. याविषयीचा आदेश काढला जाईल, अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी येथे केली.

कोरोनाच्या संसर्गामुळे शेगाव येथील गजानन महाराजांचे मंदिर दर्शनासाठी बंद !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शेगाव येथील संत गजानन महाराज यांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. २२ फेब्रुवारीपासून पुढील आदेश येईपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे.

ट्रेसिंग, टेस्टिंग आणि सर्वेक्षण वाढवण्यावर भर द्या ! – सतेज पाटील, पालकमंत्री

जे अधिकारी-कर्मचारी यांची नोंदणी लसीकरणासाठी झाली आहे, त्यांचे लसीकरण २६ फेब्रुवारीपर्यंत होण्याचे दायित्व त्या-त्या विभागप्रमुखांवर आहे, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा सातारा जिल्हा पत्रकार संघाकडून निषेध !

लोकसभा आणि विधानसभा यांच्या प्रचारासाठी सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची शेवटची प्रचार सभा झाली होती. ही सभा केवळ राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याने एका छायाचित्रकाच्या साहाय्याने टिपली होती. या वेळी कोणीही पत्रकार उपस्थित नव्हते, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

शहडोल (मध्यप्रदेश) येथे तरुणीवरील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात भाजपच्या पदाधिकार्‍याचा समावेश

बलात्काराच्या आरोपींना तत्परतेने कठोर शिक्षा होत नसल्याने अशा घटना थांबण्याऐवजी वाढत आहेत.

प्रतापगड (उत्तरप्रदेश) येथे वादातून धर्मांधांकडून ११ वर्षीय हिंदु मुलाची हत्या

उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे असे धाडस कसे होते ?

महाशिवरात्रीच्या राजयोगी स्नानासाठी १० लाख भाविक येण्याची शक्यता

हरिद्वारमध्ये एका दिवसासाठी ८० लाख ते १ कोटी लोक येऊ शकतात.

बँकेला लॉकरचे दायित्व झटकता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? बँकांना का कळत नाही कि केवळ नफा मिळवणेच हा त्यांचा उद्योग आहे ?

हॉट स्प्रिंग, गोग्रा आणि देपसांग येथूनही चिनी सैन्याने माघारी जावे ! – भारताची मागणी

पँगाँग सरोवराजवळील दोन्ही देशांचे सैनिक माघारी घेण्याची कार्यवाही झाल्यावर ही चर्चा करण्यात आली. हॉट स्प्रिंग, देपसांग आणि गोग्रा येथील चिनी सैन्य प्रत्यक्ष नियंत्रणरेषा ओलांडून पुढे आल्याने त्याने मागे जाण्याची मागणी भारत करत आला आहे.