हे शेतकरी आंदोलन नसून देशविरोधातील एक युद्ध ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन न्यूज’

‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष चर्चासत्रांतर्गत ‘शेतकरी आंदोलन कि देशविरोधी षड्यंत्र ?’ या विषयावर ऑनलाईन परिसंवाद

श्रीक्षेत्र सज्जनगड येथे ‘श्रीशिव-समर्थ स्मारक’ व्हावे, ही शिवभक्तांची इच्छा !

श्रीक्षेत्र सज्जनगड येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु श्री समर्थ रामदासस्वामी यांचे ‘श्रीशिव-समर्थ स्मारक’ असावे, अशी इच्छा राजधानी सातारा येथील शिवभक्त व्यक्त करत आहेत.

श्री साई संस्थानने लाडू-प्रसाद पुन्हा चालू करावा ! – भाविकांची मागणी

शिर्डी येथील काही व्यावसायिकांनी आपल्या दुकानात थेट लाडू विक्री चालू केली आहे. या दुकानदारांकडून एका पाकिटात ४ लाडू बांधून भाविकांना चढ्या दरात विक्री केली जात असल्याने भाविक अप्रसन्नता व्यक्त करत आहेत.

लग्नाला नकार दिल्याने युवतीला मुंबईमध्ये रेल्वेखाली ढकलणार्‍या युवकाला अटक

स्वार्थासाठी क्रौर्याच्या वाटेल त्या थराला जाणारी सध्याची तरुणाई !

शहरी नक्षलवादी वरवरा राव यांना ६ मासांचा अंतरिम जामीन

नक्षलवादी चळवळीला प्रोत्साहन देणे, हिंसक कारवायांनी सध्याचे शासन उलथवून लावण्याचा कट कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करणे आदी गंभीर आरोप असलेले वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने ६ मासांचा सशर्त जामीन संमत केला आहे.

वोकहार्ट फाऊंडशेनकडून ‘जीवनगौरव’ पुरस्काराने प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचा सन्मान

वोकहार्ट फाऊंडेशन या संस्थेने प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले. या वेळी नामवंत कॉर्पोरेट संस्थांनाही सामाजिक दायित्वासाठी ‘सी.एस्.आर्. शायनिंग स्टार’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बुलढाणा येथे ‘कोविड केंद्रा’ची दुरवस्था : इंजेक्शन, बाटल्या उघड्यावर !

‘कोविड केंद्रा’त स्वच्छता नसेल, तर तेथे कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होऊ शकतो, याची जाणीव प्रशासनाला असतांनाही त्याची दुरवस्था कशी होते ? अशी दुरवस्था करणारे आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर वरिष्ठ अधिकार्‍यांनी कठोर कारवाई केली पाहिजे !

मध्यप्रदेशातील काँग्रेसचे आमदार नीलय डागा यांच्या सोलापुरातील घरावर प्राप्तीकर विभागाची धाड

मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार नीलय डागा यांची देशभरात गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशसह अन्य राज्यांमध्ये अनुमाने २० खाद्यतेल आस्थापने आहेत. करभरणा टाळण्यासाठी त्यांनी रोखीने व्यवहार केल्याविषयी त्यांच्या आस्थापनांवर एकाच वेळी धाड टाकण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी कायद्यावर शेतकर्‍यांचे सार्वत्रिक मतदान घ्यावे ! – वि.द. बर्वे, सामाजिक कार्यकर्ते

वि.द. बर्वे यांनी पुढे म्हटले आहे की, ज्या शेतकर्‍यांची नावे सात-बाराच्या उतार्‍यावर असतील त्यांनाच मताचा अधिकार देऊन सार्वत्रिक मतदान घेऊन ज्यांची बाजू खरी असेल, हे सिद्ध होऊ द्या. ‘दूध का दूध और पानी का पानी’, ठरवण्याचा अधिकार शेतकर्‍यांना लाभू द्या.

यवतमाळ येथे अतिक्रमण हटवणार्‍या कर्मचार्‍यावर धर्मांधांकडून आक्रमण !

हा प्रकार इतर कर्मचार्‍यांचे मनोबल खच्चीकरण करणारा आहे. त्यामुळे  आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरपालिका कर्मचारी संघटनेकडून जिल्हाधिकारी एम्. देवेंद्र सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.