लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड पडताच तहसीलदाराने गॅस शेगडीवर जाळले लाखो रुपये !

अशा भ्रष्टाचार्‍यांना फाशीचीच शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात करण्याची आवश्यकता आहे !

हिंदु जनजागृती समिती करत असलेले हिंदु राष्ट्र जागृतीचे कार्य आवश्यक ! – आखाड्याच्या प्रमुखांचे प्रतिपादन

हरिद्वारमध्ये कुंभमेळ्यामध्ये राबवत असलेल्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ या संपर्क अभियानाच्या अंतर्गत श्री. सुनील घनवट यांनी अखिल भारतीय श्री पंच निर्वाणी अनी आखाडा, अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाडा आणि अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाडा यांच्या प्रमुखांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याची सध्या आवश्यकता ! – स्वामी श्री महाराज

भारत हे हिंदु राष्ट्रच आहे, त्याला वाचवण्याचे काम करावेच लागेल. हे राष्ट्र निधर्मी केल्याने प्राकृतिक समस्या निर्माण झाल्या आहेत. निधर्मी शब्द घुसडण्यात आला आहे, त्याला आमचा विरोध आहे असे मार्गदर्शन हरिनगर येथील भागीरथ धामचे स्वामी श्री महाराज यांनी केले.

हिंदु राष्ट्र आले तरच गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर आदी संकटे दूर होऊ शकतील ! – स्वामी श्रद्धानंद महाराज

तुम्ही जे हिंदु राष्ट्रासाठी कार्य करत आहात ते चांगले आहे. हिंदु राष्ट्र आले तरच गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर आदी संकटे दूर होऊ शकतील, असा विश्‍वास झारखंड येथील गोड्डा जिल्ह्यातील अध्यात्म अन् स्वदेशीचे प्रखर वक्ता, शाही पिठाधीश्‍वर स्वामी महर्षि मेंहीं हृदय धामचे स्वामी श्रद्धानंद महाराज यांनी येथे व्यक्त केला.

भाषण स्वातंत्र्याद्वारे दुसर्‍यांच्या धार्मिक भावना दुखावता येत नाहीत ! – अलाहाबाद उच्च न्यायालयाचे लखनौ खंडपीठ

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या महंमद नदीम या कार्यकर्त्याला फटकारत त्याचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला.

लस उपलब्ध होईपर्यंत शासकीय आणि खासगी केंद्रांमध्ये लसीकरण बंद !

पुढील लस उपलब्ध होईपर्यंत सर्व शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण बंद करण्याचा निर्णय पनवेल महानगरपालिकेने घेतला आहे.

सासवड शहरातील पालखीतळावर भाजी खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी ! 

प्रशासनाने नियम मोडणार्‍यांना कठोर शिक्षा करण्याचे धोरण त्वरित अवलंबावे

विवाह समारंभाला येणार्‍यांनी लसीकरण करणे किंवा कोरोना चाचणीचा अहवाल ‘निगेटिव्ह’ असणे बंधनकारक !

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही विवाह समारंभासाठी ५० वर्‍हाडींची मर्यादा कायम !

गावोगावच्या ग्रामसुरक्षा समित्या झाल्या निष्क्रीय !

ग्रामसुरक्षा समित्या निष्क्रीय झाल्याने प्रशासनाने पुढाकार घेण्याची ग्रामस्थांची मागणी .

सातारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार ! – प्रदीप विधाते

जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यामुळे सर्व आरोग्य केंद्रे निरीक्षणाखाली रहाणार आहेत.