कूचबिहार (बंगाल) येथे ‘पिकअप’ वाहनामध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने १० भाविकांचा मृत्यू

वाहनामध्ये विद्युत यंत्रणा करतांना आवश्यक ती काळजी न घेणार्‍या संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नोंदवू नये ?

तमिळनाडूत नामांकित हिंदु व्यक्तीची हत्या करण्याचा कट उघड

देशात धर्मांधांकडून हिंदूंच्या एकेक करून हत्या करण्याचे षड्यंत्र रचण्यात आल्याचे या घटनेतून लक्षात येत आहे. अशा घटनांचा सामना करण्यासाठी हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे !

हरियाणातील आमदारांना खंडणीसाठी धमकी देणार्‍या ६ सराईत गुन्हेगारांना अटक

आमदारांना खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी हरियाणा पोलिसांच्या विशेष कृती दलाच्या पोलिसांनी ६ जणांना अटक केली. राज्यातील ४ आमदारांना २४ ते २८ जून या कालावधीत दूरभाष करून धमकी देण्यात आली होती.

खासदार संजय राऊत यांच्या अटकेवरून संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ

विरोधकांनी भाजप सरकारवर केंद्रीय अन्वेषण यंत्रणांचा अपवापर केल्याचा आरोप केला आहे.

बंदुकीचे उत्तर बंदुकीनेच मिळेल ! – तमिळनाडूच्या राज्यपालांची पाकिस्तानला चेतावणी

तमिळनाडूचे राज्यपाल आर.एन्. रवि यांनी पाकपुरस्कृत आतंकवादावर जोरदार टीका करतांना ‘बंदुकीचे उत्तर बंदुकीनेच मिळेल’ अशी चेतावणी पाकिस्तानला दिली. केरळमधील कोच्चि येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

देहली न्यायालयाच्या निलंबित महिला न्यायाधीश आणि त्यांचे पती यांच्या विरोधात गुन्हा नोंद

भ्रष्टाचार नाही, असे एकतरी क्षेत्र शिल्लक आहे का ? ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

(म्हणे) ‘भजन गाणे शरीयतच्या विरुद्ध !’

‘यू ट्यूब’वरील गायिका फरमानी नाझ यांनी कावड यात्रेसाठी भगवान शिवाचे ‘हर हर शंभू’ हे भजन म्हटल्याने देवबंदच्या उलेमांनी टीका करत ‘ते शरीयतच्या विरोधात आहे’, असे म्हटले आहे.

ज्ञानवापी खटल्यात मुसलमानांची बाजू लढवणारे अधिवक्ता अभयनाथ यादव यांचे निधन

ज्ञानवापी खटल्यात मुसलमानांची बाजू लढवणारे अधिवक्ता अभयनाथ यादव यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ज्ञानवापीमधील सर्वेक्षणाच्या वेळी अभयनाथ यादव यांनी न्यायालयाच्या आयुक्तांच्या भूमिकेविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते.

‘सेक्युलर’ (निधर्मी) शब्दाच्या आड शिक्षणाचे इस्लामीकरण चालू ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक, ‘तरुण हिंदू’, झारखंड

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘भारतात शिक्षण जिहाद ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

गोव्यातील नद्या आणि समुद्रकिनारे प्रदूषित !

राज्यात अशा प्रकारे कुठे कुठे प्रकिया न करता सांडपाणी नद्या आणि समुद्र यांत सोडण्यात येते, त्याची शासनाने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी !