चीनकडून उत्तराखंडातील चमोली येथे घुसखोरीचा प्रयत्न

भारत आणि चीन यांच्यात डोकलाम तिढ्यावरून तणाव निर्माण झालेला असतांनाच चीनकडून २६ जुलैच्या दिवशी उत्तराखंडातील चमोली येथे घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. चमोली जिल्ह्यातील बाराहोटी येथे चीनचे सैनिक एक किलोमीटर आत घुसले

जमावाच्या मारहाणीला भाजपची फूस ! – काँग्रेसचा आरोप

देशात जमावाकडून होणार्‍या मारहाणीला विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल आणि गोरक्षक हे उत्तरदायी आहेत अन् त्यांना केंद्र सरकारने छुपे प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप काँग्रेसचे नेते आणि खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभेत केला

न्यायालयाच्या निकालानुसार राममंदिराची उभारणी ! – अमित शहा

अयोध्येतील राममंदिराची उभारणी ही न्यायालयाच्या निकालानुसार किंवा दोन्ही बाजूंशी चर्चा केल्यानंतरच होईल. याविषयी भाजपच्या भूमिकेत कोणताही पालट झालेला नाही, असे उत्तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी याविषयी विचारण्यात आलेल्या एका प्रश्‍नाला दिले.

(म्हणे) भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला प्राणपणाने विरोध करू !

भारत हे संविधानिकदृष्ट्या हिंदु राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला प्राणपणाने विरोध केला जाईल. हिंदु राष्ट्राच्या विरोधात निदर्शने आणि आंदोलने केली जातील, असे ऑल इंडिया कॅथलिक युनियनचे माजी अध्यक्ष तथा प्रवक्ता जॉन दयाल पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले

निलंबित पोलीस अधिकारी विश्‍वनाथ घनवट यांच्यासह अन्य पोलिसांना ३ मासांनंतरही अटक नाही

वारणानगर येथील शिक्षक वसाहतीतील ९ कोटी १८ लक्ष रुपयांच्या चोरी प्रकरणात निलंबित केलेले सांगली येथील पोलीस अधिकारी यांच्यासह एकूण ११ जणांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट झाला आहे

राज्यांतील शाळांच्या उपाहारगृहात जंकफूड विक्रीसाठी ठेवू नयेत ! – शासनाकडून शाळा व्यवस्थापनाला सूचना

शाळेच्या उपाहारगृहात जंकफूड विक्रीसाठी ठेवण्यात येणार नाहीत, याची दक्षता शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांनी घ्यावी.

स्वस्त किमतीतील घरांचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या ४ जणांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट – मुख्यमंत्री

म्हाडाची घरे स्वस्त किमतीमध्ये देण्याचे आमिष दाखवून मुंबईसह उपनगरातील गरजू लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यास नागरिकांना विनामूल्य पाणी देणार – जावेद दळवी, महापौर, भिवंडी महानगरपालिका

मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यास येथील नागरिकांना विनामूल्य पाणी देणार, असे भिवंडी महानगरपालिकेचे महापौर जावेद दळवी यांनी शहरातील समस्यांच्या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

कायद्याचा भंग करणे, हे भारतियांच्या रक्तातच ! – सरन्यायाधीश

कायद्याचा भंग करणे, न्यायालयाचा अवमान करणे हे आपल्या रक्तातच आहे. न्यायालयाचा अवमान करणे ही एक संस्कृती बनत चालली आहे, असे विधान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे.एस्. खेहर यांनी केले आहे. एका सुनावणीच्या वेळी त्यांनी हे विधान केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now