सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांना लाच स्वीकारतांना अटक !

प्रस्तावावर स्वाक्षरी करून पुणे येथील शिक्षण संचालक यांच्या कार्यालयात पाठवण्यासाठी तक्रारदाराकडे ५० सहस्र रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याविषयीची तक्रार केली होती.

येत्या वर्षभरात राज्यातील ५ लाख युवकांना रोजगार देऊ ! – मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकासमंत्री

१ नोव्हेंबर या दिवशी एलफिन्स्टन टेक्निकल महाविद्यालयात कौशल्य विद्यापिठाच्या शिक्षणाला प्रारंभ करण्यात आला.

अकोला येथे लोकमान्य टिळक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते अनावरण !

राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याच्या ठिकाणी झालेल्या दुर्दशेकडे कानाडोळा करणार्‍या प्रशासनातील अधिकार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी !

बावधन येथील प्रस्तावित कचरा प्रकल्पात नियमांचे उल्लंघन !

प्रकल्पामुळे नदीकाठी प्रदूषण होणार असल्याने पर्यावरण कार्यकर्त्यांनी २६ ऑक्टोबर या दिवशी या प्रकल्पाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली होती.

पाचोरा (जिल्हा जळगाव) येथील श्रीराम मंदिरात विविध उपक्रमांचे आयोजन !

या कालावधीत सव्वा कोटी ‘सीताराम’ जपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तरी जास्तीतजास्त भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

नागरिकांच्या तक्रारींची वेळीच नोंद घ्या !

असे परिपत्रक का काढावे लागते ? पोलिसांना स्वत:हून त्यांचे काम का करावेसे वाटत नाही ?

पंतप्रधान मोदी यांची मोरबी (गुजरात) येथे अपघातग्रस्त भागाला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सात्वन केले. यासह त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन घायाळ झालेल्या लोकांची विचारपूस केली.

शैक्षणिक तणावावर तोडगा म्हणून ‘आयआयटी’ची पदविका योजना

काही विद्यार्थी शैक्षणिक तणावाला तोंड देऊ शकत नसल्याने ‘आयआयटी’ शैक्षणिक संस्थांमध्ये आत्महत्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

कार्तिकी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणार्‍या दिंडीमध्ये चारचाकी वाहन घुसून ७ भाविकांना चिरडले !

मृत वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावाचे रहिवासी आहेत. ही दिंडी कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पायी पंढरपूरकडे निघाली होती. घायाळ झालेल्या वारकर्‍यांना सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात डान्सबारवर बंदी; मात्र नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या लावणीच्या नावाखाली उघडपणे चालणार्‍या अश्‍लील नृत्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष !

अश्‍लीलता पसरवणार्‍यांवर पोलीस कारवाई का करत नाहीत ?