संजय राऊत यांची अटक अवैध, अद्याप मुख्य आरोपींना अटक का नाही ?

पत्राचाळ घोटाळ्याच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने स्वत:च्या मर्जीनुसार आरोपी निवडले आहेत. या प्रकरणात राकेश आणि सारंग वाधवान हे मुख्य आरोपी असतांना अद्याप त्यांना अटक का करण्यात आलेली नाही ?

आंदोलनाला वैध मार्गाने विरोध करणार्‍या हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांना धक्काबुक्की

येथील शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयासमोर काही महिला अधिवक्त्यांनी ८ नोव्हेंबर या दिवशी पू. संभाजी भिडेगुरुजींच्या विरोधात हातात फलक घेऊन घोषणा देत आंदोलन केले.

संजय राऊत यांना जामीन संमत

गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्वसन घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जामीन संमत करण्यात आला. ‘पी.एम्.एल्.ए.’ न्यायालयात त्यांच्या जामिनावर सुनावणी चालू होती.

त्रिपुरारि पौर्णिमेला सहस्रावधी भाविकांनी महाआरती करून घेतले बाणगंगेचे दर्शन !

भारत ही पुण्य आणि धर्म भूमी आहे. स्वामी विवेकानंद यांनी ‘पाश्चात्त्य लोक देवापेक्षा देहावर प्रेम करतात; परंतु या जगात एका देशातील लोक देहापेक्षा देवावर प्रेम करतात, तो देश भारत आहे’, असे भारतदेशाचे श्रेष्ठत्व सांगितले आहे.

हिंदूंची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रहित करा ! – शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) येथे निवेदन

हिंदूंची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रहित करा, या मागणीसाठी शिरोळ येथील तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले. हे निवेदन महसूल अवल कारकून शब्बीर मोमीन यांनी स्वीकारले.

चंद्रपूर येथे आरोपी हत्या केलेल्या तरुणाचे शीर घेऊन ‘फुटबॉल’प्रमाणे खेळले !

दुर्गापूर महाऔष्णिक वीजकेंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ पूर्व वैमनस्यातून ८ जणांच्या टोळीने एकाचे शीर धडावेगळे केले आणि त्याच्या समवेत ते ‘फुटबॉल’प्रमाणे खेळले.

माहेश्वरी संघटनेच्या युवती शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीचे व्याख्यान !

विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटना आणि मणीरत्न रिसॉर्ट अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ५ आणि ६ नोव्हेंबरला दोन दिवसांचे ‘तेजस्विनी २०२२’ हे शिबिर युवतींसाठी आयोजित केले होते.

श्री विठ्ठल प्रसाद भजनी मंडळाच्या वतीने ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

सोहळ्यामध्ये प्रतिदिन पहाटे ५ ते सकाळी ७ या वेळेत काकड आरती, सकाळी ९ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन, सायंकाळी ५ ते ७ या वेळेत प्रवचन, सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत कीर्तन आणि ९ नंतर जागरण असे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत.

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांचे वडील आणि ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले विजय (नाना) वर्तक (वय ७७ वर्षे) यांचे निधन

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मामेभाऊ तथा सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांचे वडील विजय (नाना) वर्तक यांचे ९ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ७ वाजता नागोठणे येथील त्यांच्या रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

संभाजीनगर येथील भुयारी मार्गासाठी मनसेच्या वतीने आंदोलन !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ९ नोव्हेंबर या दिवशी येथील  शिवाजीनगरच्या भुयारी मार्गासाठी आंदोलन करण्यात आले. सरकारने त्वरित पूर्ण निधी संमत करून भुयारी मार्ग सिद्ध करून द्यावा; अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, अशी चेतावणी मनसेच्या वतीने या वेळी देण्यात आली.