चक्रीवादळात बुडालेल्या नौकेवरील १० भारतियांच्या शोधासाठी नौदलाची नौका जपानला रवाना

गेल्या आठवड्यात प्रशांत महासागरात आलेल्या चक्रीवादळात फिलिपाईन्सजवळ एक व्यापारी नौका बुडाली होती. यामध्ये २६ भारतीय खलाशी होते. त्यामधील १६ जणांना वाचवण्यात यश आले; मात्र १० भारतीय बेपत्ता आहेत.

पदवीधर मुसलमान मुलींना केंद्रशासनाकडून मिळणार ५१ सहस्र रुपये

पदवीपर्यंतचे शिक्षण विवाहापूर्वी पूर्ण करणार्‍या मुसलमान मुलींना केंद्र शासनाकडून विशेष पारितोषिक म्हणून प्रत्येकी ५१ सहस्र रुपये मिळणार आहेत. याविषयी ‘मौलाना आझाद एज्युकेशन फाऊंडेशन’ ने दिलेला प्रस्ताव केंद्रातील अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाने स्वीकारला आहे.

सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात श्री लक्ष्मीदेवी, इंद्र आणि श्री कुबेर यांचा पूजाविधी संपन्न

येथील सनातनच्या आश्रमात आश्‍विन अमावास्येला म्हणजेच २० ऑक्टोबर या दिवशी श्री लक्ष्मीदेवी, इंद्र आणि कुबेर यांचे पूजन करण्यात आले. सनातनच्या साधक पुरोहित पाठशाळेतील साधक-पुरोहित वेदमूर्ती केतन शहाणे गुरुजी यांनी पूजाविधीचे यजमानपद भूषवले

रहित करण्यात आलेल्या तिकिटांद्वारे रेल्वे प्रशासनाला ७३ कोटी रुपयांचा लाभ

वेटिंग तिकीट रहित करण्यासाठी कापण्यात आलेल्या पैशातून रेल्वे प्रशासनाला गेल्या वर्षी ७३ कोटी रुपयांचा लाभ झाला. ही माहिती सामाजिक कार्यकर्ता चंद्रशेखर गौड यांनी माहितीच्या अधिकारात मिळवली.

तिरुपती येथे मुंडण करणार्‍या भाविकांकडून पैसे घेणार्‍या २४३ नाभिकांची हकालपट्टी

येथे भगवान व्यंकटेश्‍वराच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांचे मुंडण करण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून पैसे घेण्याच्या आरोपावरून आंध्रप्रदेशमधील प्रसिद्ध तिरुमला देवस्थानने २४३ नाभिकांना सेवेतून बडतर्फ केले आहे.

गोव्यात प्रदूषणाच्या भीतीमुळे फटाक्यांच्या विक्रीमध्ये घट

फटाके उडवल्याने प्रदूषण होत असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. यामुळे यंदा प्रदूषणाच्या भीतीमुळे दीपावलीच्या निमित्ताने फटाक्यांच्या विक्रीमध्ये घट झाल्याचा दावा शहरातील फटक्यांचे घाऊक विक्रेते अनिल पानकर यांनी प्रसारमाध्यमांकडे केला.

मला हिंदी चांगली येत नसल्याने मी पंतप्रधान बनू शकलो नाही ! – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

मनमोहन सिंह चांगले पंतप्रधान होते; मात्र मला जनतेची भाषा म्हणजे चांगली हिंदी येत नसल्याने पंतप्रधान बनू शकलो नाही, असे विधान माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले.

एका मतदान केंद्रावर १ सहस्र ४०० हून अधिक मतदार असू नयेत ! – निवडणूक आयोग

निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे की, एका मतदान केंद्रावर १ सहस्र ४०० हून अधिक मतदारांची संख्या असू नये; कारण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातून १ सहस्र ५०० हून अधिक स्लीप निघत नाहीत.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवाजी पार्क येथे दीपोत्सव

शिवरायांच्या राज्याभिषेकदिनाच्या दिवसाप्रमाणे या वेळी ३४४ दिव्यांची आरास करण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF