विद्यार्थिनीला उत्तीर्ण करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडणार्‍या प्राध्यापकाला अटक !

असे प्राध्यापक म्हणजे शिक्षणक्षेत्राला लागलेला कलंक. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

देशात कोरोनाचा धोका : जगातील पहिल्या ‘नेझल व्हॅक्सिन’ला सरकारची मान्यता

भारत सरकारने जगातील पहिल्या ‘नेझल व्हॅक्सिन’ला (अनुनासिक कोरोना लसीला) मान्यता दिली आहे. ‘भारत बायोटेक’ आस्थापनाची नाकातून दिली जाणारी ही लस वर्धक मात्र (बूस्टर डोस) म्हणून वापरली जाईल.

कुख्यात खुनी चार्ल्स शोभराज याची १९ वर्षांनंतर कारागृहातून सुटका !

कुख्यात खुनी चार्ल्स शोभराज (वय ७८ वर्षे) याची १९ वर्षांनंतर कारागृहातून सुटका करण्यात आली. चार्ल्स शोभराज याच्या वयाचा विचार करून नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला सोडण्याचा आदेश दिला होता.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे २४ घंट्यांत ‘लव्ह-जिहाद’ची ३ प्रकरणे उजेडात !

लव्ह जिहादच्या विरोधात केवळ कायदाच नव्हे, तर धर्मांध युवकांचे हिंदु युवतींकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धारिष्ट्य होणार नाही अशी वचक निर्माण करणे आवश्यक !

चीनमध्ये प्रतिदिन आढळतात कोरोनाचे १० लाख रुग्ण !

चीनमध्ये प्रतिदिन १० लाख कोरोनाचे रुग्ण आढळत असून  प्रतिदिन स्रहस्रो लोकांचा मृत्यू होत आहे. हा आकडा याहीपेक्षा पुष्कळ अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

सैन्याच्या वाहनाला झालेल्या अपघातात १६ सैनिकांचा मृत्यू  

हे वाहन सकाळी चट्टेनहून थांगूच्या दिशेने निघाले होते. झेमा येथे एका तीव्र वळणावर सैन्याच्या ३ वाहनांपैकी एक वाहन तीव्र उतारावरून घसरले आणि अपघात झाला.

रामसेतूसारखी रचना पूर्वी अस्तित्वात असल्याचे संकेत !

केंद्र सरकारचे संसदेत विधान ! ‘रामसेतू’ असल्याचे मानले जाते त्या ठिकाणची उपग्रहांद्वारे छायाचित्रे काढण्यात आली आहेत. सोप्या शब्दांत सांगायचे, तर खरे रूप तेथे आहे, हे सांगणे अवघड आहे. तथापि असे काही संकेत आहेत, जे सूचित करतात की, अशा प्रकारची रचना तेथे अस्तित्वात असू शकते.

(म्हणे) ‘भारत मुसलमानांसाठी रहाण्यायोग्य नसल्याने मी माझ्या मुलांना विदेशातच रहाण्यास सांगितले !’

जर सिद्दीकी यांना खरेच असे वाटत असेल, तर त्यांनी स्वतःसह त्यांच्या सर्वच धर्मबांधवांना विदेशात जाण्यास सांगावे ! किती देश तुम्हाला रहाण्यासाठी शरण देतात, हेसुद्धा तुमच्या लक्षात येईल !

भारतात येणार्‍या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोरोना नियमावली घोषित

नव्या नियमावलीनुसार भारतात येणार्‍या प्रवाशांना लसीकरण प्रमाणपत्र समवेत बाळगणे बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक प्रवाशाला मुखपट्टी (मास्क) घालणे अनिवार्य करण्यात आले आहे.

आमदार मुक्ता टिळक यांना विधानसभेत श्रद्धांजली !

मुक्ता टिळक यांच्यासारख्या निष्ठावान, कर्तृत्ववान लोकप्रतिनिधींच्या निधनामुळे केवळ भाजपचीच नव्हे, तर समाजाचीही हानी झाली आहे.