गोवा : म्हादईवरील कळसा-भंडुरा प्रकल्पाला केंद्राकडून मान्यता

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, या प्रकल्पाला जरी केंद्रशासनाने मान्यता दिली असली, तरी वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार कर्नाटक सरकार कळसा येथील म्हादई नदीचे पाणी वळवू शकत नाही. – विरोधी पक्ष नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया

तक्रार करणारी महिला आणि तिचा पती यांच्यावरच पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

सदर महिला आणि तिच कुटुंबीय यांना संरक्षण देऊन या प्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडतांना केली. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते.

पारंपरिक मासेमार व्यावसायिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे ! – सुधीर मुनगंटीवार

मासेमारांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व समुद्रकिनारी जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींची एक समिती नियुक्त केली जाईल, अशी घोषणा मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३० डिसेंबर या दिवशी विधानसभेत केली.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील ‘वॉटर प्युरिफायर’ खरेदी घोटाळ्याचा एका मासात निर्णय

या प्रकरणात संपूर्ण समितीचीच चौकशी करण्याची आवश्यकता असून विभागीय आयुक्तांद्वारे एका मासात चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. 

प्रलोभने दाखवून परदेशात पाठवलेल्या बेरोजगार तरुणांना देशात परत आणले जाईल ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

फसवणुकीद्वारे काही बेरोजगार तरुणांना परदेशात पाठवले असेल, तर त्यांना देशात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० डिसेंबर या दिवशी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना दिली.

श्री सिद्धीविनायक मंदिरातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी होणार !

प्रभादेवी (मुंबई) येथील ‘श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासा’त शिवभोजन थाळी, मंदिरांचे नूतनीकरण, ‘क्यू.आर्. कोड’ यंत्रणेसाठीच्या निविदा आणि प्रसादासाठी खरेदी करण्यात आलेले तूप, या प्रक्रियांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार सदा सरवणकर यांनी केला.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय उघडणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा चर्चेच्या प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते. यावेळी त्यांनी मांडलेली कांही सूत्रे . . .

केरळमधील प्रसिद्ध गुरुवायूर मंदिराकडे १ सहस्र ७३७ कोटी रुपयांच्या ठेवी ! – माहितीच्या अधिकारात तपशील उघड

त्रिसूर येथील गुरुवायूरमधील प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिराकडे १ सहस्र ७३७ कोटी रुपयांच्या बँक ठेवी आणि २७१.०५ एकर भूमी आहे, ‘माहिती अधिकारा’त मागवलेल्या उत्तरात ही माहिती मिळाली आहे.

नोएडा (उत्तरप्रदेश) येथील औषध आस्थापनावर धाड

उझबेकिस्तानमध्ये भारतीय आस्थापनाचे कफ सिरप घेतल्याने १८ मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा तेथील सरकारने केला होता. त्यानंतर केंद्रशासनाच्या विविध संस्था आणि उत्तरप्रदेशचा अन्न आणि औषध विभाग यांच्या एका पथकाने नोएडा येथील आस्थापनाच्या कार्यालयात धाड टाकली.

अल्पसंख्यांक शाळांमधील पदभरती शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी केली जाईल ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

विधान परिषद प्रश्नोत्तरे… या अंतर्गत दीपक केसरकर, शिक्षणमंत्री यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलेली उत्तरे . . .