नागपूर जिल्ह्यातील ५४ अवैध शाळांवर कारवाई करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

जिल्ह्यातील ५४ अवैध शाळांवर कारवाई करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांना दिला.

नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून डिजिटल शिक्षणाची सुविधा

नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाची सुविधा देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून ही सुविधा मिळणार असून सर्व वर्ग डिजिटल करण्यासाठी १४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

संस्थाचालकांना अवमान नोटीस बजावण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन आणि भत्ते मिळावेत, यासाठी प्रविष्ट करण्यात आलेल्या अवमान याचिकेत शिक्षण संस्थाचालकांना अवमान नोटीस बजावण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिला आहे.

मनपाच्या देयकामध्ये खाजगी ग्राहकांची नावे समाविष्ट करून लाखो रुपये लाटल्याप्रकरणी महावितरणाचा कर्मचारी निलंबित !

येथे महावितरणचा झोन क्रमांक ४ मध्ये मनपाच्या नावावर असलेल्या वीज मीटरच्या देयकामध्ये दर मासाला खाजगी रहिवाशांची नावे समाविष्ट करून ७१ लाख ३० हजार रुपये बळकावणार्‍या राजेश घोरपडे नामक महावितरणाच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला निलंबित करण्यात आले आहे.

खाजगी चिकित्सालये आणि नर्सिंग होम यांचा ‘दुकान आणि आस्थापना कायदा १९४८’ मध्ये समावेश करण्यास ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चा विरोध

खाजगी चिकित्सालये, नर्सिंग होम यांचा ‘दुकान आणि आस्थापना कायदा, १९४८’ मध्ये समावेश करण्याच्या सरकारच्या निर्णयास ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने विरोध केला असून यासंदर्भात न्यायालयीन साहाय्य घेतले जाणार आहे.

मुलीच्या व्यक्तिगत आयुष्यात वडील ढवळाढवळ करू शकत नाहीत ! – सर्वोच्च न्यायालय

केरळमधील लव्ह जिहाद प्रकरणी केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. तसेच वडील मुलीच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाहीत, असे म्हटले आहे

वाशी (नवी मुंबई) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे महागाईच्या विरोधात धिक्कार आंदोलन

वाशी येथील शिवाजी चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १ ऑक्टोबरला वाढत्या महागाईच्या विरोधात ‘धिक्कार आंदोलन’ करण्यात आले.

पालघर येथे आस्थापनामुळे परिसर प्रदूषित : कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी

वाडा तालुक्यातील ‘छेडा स्पेशालिटी फूड प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनामुळे होणारे वायू प्रदूषण आणि आस्थापनातून बाहेर पडणारे सांडपाणी यांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे याविषयी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.

तरुणी आणि महिला मोठ्या प्रमाणात लव्ह जिहादमध्ये फसत आहेत ! – राष्ट्र सेविका समिती

तरुणी आणि महिला मोठ्या प्रमाणात लव्ह जिहादच्या जाळ्यात फसत आहेत. एकट्या केरळमध्ये ४५५ तरुणी लव्ह जिहादमध्ये अडकल्या आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांत औषधांचा तुटवडा

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे मागील १० मासांपासून रुग्णालयात औषधांचा पुरवठा झालेला नाही. या प्रकरणावरून स्थायी समितीने प्रशासनाला धारेवर धरले असता औषधांचा पुरवठा करण्यास दिरंगाई झाल्याचे प्रशासनाने मान्य केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now