(म्हणे)‘…तर मी हिंदु धर्माचा त्याग करेन !’

जर भाजपने दलित आणि इतर वर्गांचे शोषण थांबवले नाही, तसेच हिंदु धर्मातील वाईट रीती थांबवल्या नाहीत, तर मी माझ्या करोडो अनुयायांसह हिंदु धर्माचा त्याग करेन.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख

फेब्रुवारीमध्ये बडोदा येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कादंबरीकार आणि कथालेखक लक्ष्मीकांत देशमुख यांची नियुक्ती झाली आहे.

वरिष्ठांकडून सामाजिक संकेतस्थळांद्वारे देण्यात येणारे आदेश पाळणे कर्मचार्‍यांना बंधनकारक नाही !

वरिष्ठ अधिकार्‍यांंकडून कनिष्ठ कर्मचार्‍यांना व्हॉटस्अ‍ॅप वा अन्य सामाजिक संकेतस्थळांचा उपयोग करून आदेश देण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. सर्वच शासकीय, निमशासकीय आणि खाजगी संस्थांमध्ये हा प्रकार घडत आहे.

उल्हासनगर येथे पालिका आणि पोलीस यांचा डान्सबारमधील अनधिकृत बांधकामाकडे कानाडोळा !

शहरात मोठ्या प्रमाणात ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार चालू असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यातच बारमधील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात पोलीस उपायुक्तांनी पालिका आयुक्तांना पत्र देऊनही पालिकेचे कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे.

इस्रायलच्या गाझा पट्ट्यात केलेल्या आक्रमणामध्ये २ पॅलेस्टिनींचा मृत्यू

इस्रायलची राजधानी जेरुसलेमला अमेरिकेने मान्यता दिल्यावर पॅलेस्टाईनमध्ये विरोध केला जात आहे. पॅलेस्टाईन समर्थकांनी निदर्शने आणि दगडफेक केली.

पुणे येथे ह.मो. मराठे यांना मरणोत्तर ‘ऋग्वेद भूषण’ पुरस्कार

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त १० डिसेंबरला सायंकाळी भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात ‘ऋग्वेद भूषण’ पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

नागपूर येथे पोहोचलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘हल्लाबोल’ आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यवतमाळ येथून चालू केलेला ‘हल्लाबोल’ मोर्चा हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर ११ डिसेंबरला शहरात आला आहे.

(म्हणे) ‘देशात दुभंगत चाललेल्या मनःस्थितीला कारणीभूत असणारा विचार आज सत्तेवर आहे !’- नाटककार डॉ. सतीश आळेकर

कलाकारासाठी भीतीचे वातावरण असणे अयोग्य आहे. त्यासाठी त्याला अनुकूल राज्यकर्ते असायला हवेत, तसेच कलाकाराने भीतीविषयी बोलायला हवे. १९९२ पासून देशात दुभंगत चाललेल्या मनःस्थितीला कारणीभूत असणारा विचार आज सत्तेवर आहे, असे विचार नाटककार डॉ. सतीश आळेकर यांनी ‘तन्वीर सन्मान’ स्वीकारतांना मांडले.

ठाण्यात गॅस सिलेंडरचा स्फोट

येथील वर्तकनगर परिसरातील भीमनगर झोपडपट्टीत आज दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक चार सिलेंडरचा स्फोट झाला.

राज्यभरातील १ सहस्र ३०० शासकीय शाळा बंद करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय

शैक्षणिक वर्ष २००५-०६ ते २०१५-१६ या कालावधीत महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येत पाच लाख एवढी वाढ झाली असून मराठी शाळांमधील विद्यार्थी संख्येत सात लाख इतकी घट झाली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने राज्यभरातील १ सहस्र ३०० शासकीय शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


Multi Language |Offline reading | PDF