(म्हणे) कुर्बानीसाठी सुरक्षित वातावरणाची निर्मिती करा आणि बकरी ईदला एक नव्हे, तर दोन दिवस सुट्टी घोषित करा !

२ सप्टेंबर या दिवशी होणार्‍या ईद-उल-अधा (बकरी ईद)च्या वेळी सुरक्षित वातावरणाची निर्मिती करा, तसेच बकरी ईदला एक नव्हे, तर दोन दिवस सुट्टी घोषित करा, अशी मागणी प्रोग्रेसीव मुस्लिम फ्रंट या मुसलमान संघटनेने शासनाकडे केली आहे.

आजोती (तालुका पंढरपूर) येथील होळकर विद्यालयात सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म आणि सुसंस्काराचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन !

सुसंस्कार आणि चांगल्या सवयी अंगीकारून आपले जीवन सुसंस्कारित करणे आणि स्वत:तील दोष घालवून गुण वाढवणे.

मुंबई उच्च न्यायालयात भाऊ रंगारी मंडळाची याचिका प्रविष्ट

‘भाऊ रंगारी यांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक म्हणून जाहीर करावे’ आणि ‘उत्सवाचे हे १२५ वे वर्ष नसून १२६ वे वर्ष आहे’, या मागण्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयात भाऊ रंगारी मंडळाने याचिका प्रविष्ट केली आहे.

पुणे शहराच्या मध्यवस्तीत भरदिवसा अज्ञातांकडून दरोडा

शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या श्री कसबा गणपति मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘क्विक कुरिअर’च्या कार्यालयावर २२ ऑगस्टला दुपारी अज्ञात ५ हून अधिक जणांनी सशस्त्र दरोडा घातला.

कोल्हापूर येथे ९ सप्टेंबरपासून ‘आभूषणम प्रदर्शना’चे आयोजन – भरत ओसवाल

ऑल इंडिया जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन (जीजेएफ), कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या सहयोगाने येथे ‘आभूषणम प्रदर्शना’चे आयोजन करण्यात आले आहे.

चिंचवड येथील मोरया गोसावी समाधी मंदिरातून श्री मंगलमूर्तींच्या पालखीचे मोरगावकडे प्रस्थान

भाद्रपद यात्रेनिमित्त महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिरातून श्री मंगलमूर्तींच्या पालखीने मोरगावकडे प्रस्थान ठेवले.

सार्वजनिक गणेशोत्सवात नावावरून चालू असलेला वाद म्हणजे मूर्खपणा – राज ठाकरे

‘लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांच्या नावांवरून सार्वजनिक गणेशोत्सवात चालू असलेला वाद म्हणजे मूर्खपणा आहे.

पुण्यातील श्रीमंत बाजीराव पेशवे पुतळा परिसराच्या सुशोभिकरणाच्या व्ययासाठी स्थायी समितीची संमती

येथील शनिवारवाडा परिसरातील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याच्या परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी महानगरपालिकेच्या स्थायी समितीने ५७ लक्ष रुपयांच्या व्यय प्रस्तावास संमती दिली आहे.

जावली (जिल्हा सातारा) येथील तहसीलदारांचे श्री गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन

श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलप्रदूषण होते. त्यामुळे गणेशोत्सव मंडळे आणि नागरिक यांनी श्री गणेशमूर्ती दान करावे, असे आवाहन तहसीलदार सौ. रोहिणी आखाडे यांनी केले.

न्यायालयाच्या व्यवहारात मराठी भाषेच्या वापरासाठी अभ्यासगटाची स्थापना

न्यायालयाच्या व्यवहारात मराठीचा सक्षमपणे वापर करण्याच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now