येणार्‍या ६ मासात समान नागरी संहिता अंमलात आणावी ! – प्रमोद मुतालिक, संस्थापक, श्रीराम सेना

येणार्‍या ६ मासात समान नागरी संहिता अंमलात आणावी, १०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येचे उच्चस्तरीय अन्वेषण केले जावे यांसह राज्यातील खासगी मंदिरांमध्ये भ्रमणभाष बंदी केली जावी, अशी मागणी श्री. प्रमोद मुतालिक यांनी केली.

गोमंतकियांना टोमॅटो दरवाढीचा फटका बसणार नाही ! – कृषीमंत्री नाईक 

‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारने प्रत्येक गोमंतकीय कुटुंबाला २ किलो टोमॅटो विनामूल्य देण्याची मागणी विधानसभेत केली. या मागणीवर बोलतांना कृषीमंत्री रवि नाईक यांनी ही माहिती दिली.

६ वर्षांत गोव्यातील ४५ सहस्र लोक दारिद्र्यरेषेबाहेर !

नीती आयोगाने नुकताच ‘राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक : प्रगतीसंबंधी समीक्षा २०२३’ या नावाने अहवाल प्रसिद्ध केला आहे. नीती आयोगाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

गोवा : ‘बालरथ’ कर्मचार्‍यांना समाधानकारक वेतनवाढ देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

‘बालरथ’ (लहान मुलांना शाळेत ने-आण करणारी छोटी बस) चालक आणि वाहक यांनी १७ जुलैपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचे पडसाद १८ जुलै या दिवशी विधानसभेत उमटले.

गोवा : आज प्रारंभ होणार्‍या चौथ्या ऊर्जा संक्रमण कार्यकारी गटाच्या बैठकीत ६ प्राधान्ये

या चौथ्या बैठकीतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंत्रीस्तरीय निवेदनाच्या मसुद्यावर होणारी सविस्तर चर्चा ही आहे. बैठकीला जोडूनच विविध अन्य कार्यक्रमांचे (साइड इव्हेंट्सचे) आयोजन करण्यात आले आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे ३ मासांत महाराष्‍ट्रात ९५ जण मृत्‍यूमुखी !

नैसर्गिक आपत्तीमुळे मार्च ते मे २०२३ या कालावधीत महाराष्‍ट्रातील ९५ जण मृत्‍यूमुखी पडले आहेत, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी १८ जुलै या दिवशी विधानसभेत दिली.

मंदिर रक्षणासाठी संघटित होण्‍याचा वसई येथील मंदिर विश्‍वस्‍तांचा निर्धार !

१६ जुलै या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि मंदिर महासंघ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने बैठक पार पडली. बैठकीत वसई, विरार, नालासोपारा परिसरातील २९ मंदिरांचे विश्‍वस्‍त आणि प्रतिनिधी उपस्‍थित होते.

सोमवती अमावास्‍येच्‍या निमित्ताने लाखो भाविकांनी घेतले जेजुरीतील खंडोबाचे दर्शन !

सोमवती अमावास्‍येचा पर्वकाळ असल्‍याने जेजुरीमध्‍ये ‘सोमवती यात्रा’ भरली होती. सोमवारी उगवत्‍या सूर्याला अमावास्‍या असली की, त्‍या दिवशी जेजुरीच्‍या खंडोबा देवाची सोमवती अमावास्‍या यात्रा भरते.

‘ऑनलाईन’ कपडे मागवणार्‍या महिलेची ३२ सहस्र रुपयांची फसवणूक

महिलेने ‘ड्रेस डॉट इन’ या ‘फेसबूक साईट’वरून ‘ऑनलाईन’ पद्धतीने कपडे मागवले होते. कपड्यांच्‍या गठ्ठ्यातून (पार्सलमधून) ‘ड्रेस’ऐवजी ‘फॉल’ (साडीला खालच्‍या बाजूने लावलेले कापड) लावलेली साडी आणि चिंध्‍या आल्‍या.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना धमकी देणार्‍याला अटक

राज्‍याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांना खंडणीसाठी जिवे मारण्‍याची वारंवार धमकी देणार्‍या प्रदीप भालेकर या संशयितावर मलबारहिल पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करून अटक करण्‍यात आली आहे.