अवकाळी पावसाची हानीभरपाई घोषित करण्‍याच्‍या मागणीवरून विधानसभेत विरोधकांचा सभात्‍याग !

विधीमंडळाच्‍या कामकाजाला प्रारंभ होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्‍या शेतीपिकांच्‍या हानीविषयी चर्चा करण्‍यासाठी स्‍थगन प्रस्‍तावावर चर्चा करण्‍याची अनुमती मागितली.

अवकाळी पावसामुळे ८ जिल्‍ह्यांतील १३ सहस्र ७२९ हेक्‍टर शेतीची हानी ! – उपमुख्‍यमंत्री

अवकाळी पावसामुळे ८ जिल्‍ह्यांतील १३ सहस्र ७२९ हेक्‍टर शेतपिकांची हानी झाल्‍याची माहिती उपमुख्‍यमंत्री फडणवीस यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत दिली.

रंग खेळल्‍यानंतर हात-पाय धुण्‍यास गेलेल्‍या विद्यार्थ्‍याचा नदीमध्‍ये बुडून मृत्‍यू !

रंग खेळून इंद्रायणी नदीमध्‍ये हात-पाय धुवायला गेलेला अभियांत्रिकीचा विद्यार्थी जयदीप पाटील याचा पाय घसरून नदीत बुडून मृत्‍यू झाला आहे. तो जळगावचा रहिवासी आहे.

सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पं. डॉ. केशव गिंडे यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन सोहळा’ भावपूर्ण वातावरणात संपन्‍न !

‘अमूल्‍य ज्‍योती’ आणि ‘केशव वेणू प्रतिष्‍ठान’ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पं. डॉ. केशव गिंडे यांचा सहस्रचंद्रदर्शनाचा कार्यक्रम ५ मार्च या दिवशी आयोजित करण्‍यात आला होता. या प्रसंगी करवीरपीठाचे जगद़्‍गुरु शंकराचार्य प.प. श्री विद्यानृसिंह भारती स्‍वामी यांची वंदनीय उपस्‍थिती लाभली.

कोकणातील लोककलेला राजाश्रय हवा !

शिंदे-फडणवीस सरकारने या लोककलांना राजाश्रय मिळवून दिला, तर खर्‍या अर्थाने लोककलावंतांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चिपळूण येथे अद्ययावत रुग्णालय उभारावे !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसणे, हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर मुंबईच्या किनारपट्टीवर आपत्कालीन स्थितीत उतरवले

भारतीय नौदलाच्या ‘स्वदेशी ध्रुव’ हे हेलिकॉप्टर मुंबईच्या किनारपट्टीवर आपत्कालीन स्थितीत उतरवण्यात आले. त्यात तांत्रिक बिघाड झाला होता. या हेलिकॉप्टरमधील तिघा जणांना नौदलाच्या गस्ती जहाजाने वाचवले.

आर्थिक विकासदरात ६.८ टक्क्यांची वाढ अपेक्षित !

२०२२-२३ च्या रब्बी हंगामात ५७.७४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्यात मागील वर्षाच्या तुलनेत कडधान्यांच्या उत्पादनात ३४ टक्के वाढ होईल, असा अंदाज आहे.

(म्हणे) ‘सरकारी नोकर्‍यांमध्ये तमिळींना प्राधान्य द्या !’-‘टीपीडीके’संघटना

अशा मागण्या करणारी ‘टीपीडीके’ संघटना ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर अशी दरी वाढवून समाजात फूट पाडत आहे. अशा संघटना सामाजिक ऐक्यासाठी धोकादायक आहेत !

मध्यप्रदेशातील ख्रिस्ती मिशनरी शाळेत आदिवासी मुलींचा लैंगिक छळ !

ख्रिस्त्यांच्या चर्चमध्ये नन आणि मुले यांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना जगभर घडल्या आहेत. आता ख्रिस्त्यांकडून चालवण्यात येणार्‍या शाळांमध्येही असे प्रकार घडतात, हे संतापजनक ! अशा शाळांमध्ये मुलांना पाठवायचे कि नाही, हे हिंदु पालकांनी ठरवावे !