वर्ष २०२४ पूर्वी समान नागरी कायदा लागू करा ! – योगऋषी बाबा रामदेव यांची मागणी

रामदेवबाबा पुढे म्हणाले की, ज्या आकांक्षेने लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवण्याचे काम चालू झाले आहे.

काश्मीरमधील प्राचीन श्री शारदादेवी मंदिराचे पुनर्निर्माणानंतर उद्घाटन  

गेली अनेक दशके हे मंदिर दयनीय स्थितीत होते.

वृक्ष लागवडीच्या कामात शासन भ्रष्टाचार सहन करणार नाही ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

वृक्षलागवड हे ईश्वरीय कार्य आहे. याविषयी अपहाराची कोणती तक्रार असेल, तर शासनाला त्याची माहिती द्या. वृक्ष लागवडीच्या कामात शासन भ्रष्टाचार सहन करणार नाही, असे वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २३ मार्च या दिवशी विधान परिषदेत केले.

नागपूर येथे हिंदु नववर्षानिमित्त विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती !

नागपूर येथे हिंदु नववर्षानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले. गुढीपाडव्याविषयी माहिती देणार्‍या हस्तपत्रकाचे वितरण करण्यात आले. मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात आली.

नंदुरबार येथे गुढीपाडव्यानिमित्त धर्मप्रसार आणि सामूहिक गुढीपूजन पार पडले !  

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त जिल्ह्यात गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रबोधनपर भित्तीपत्रके लावणे, फलकलेखन करणे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी यांना भेटून हिंदु नववर्षच्या शुभेच्छा देणे, तसेच सामूहिक गुढी उभारणे आदी माध्यमातून धर्मप्रसार आणि प्रबोधन करण्यात आले.

मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा !

वर्ष २०१९ मध्ये कर्नाटकातील एका जाहीर सभेत गांधी यांनी ‘सर्व चोरांची नावे ‘मोदी’ कशी काय ?’ असा प्रश्‍न उपस्थित केला होता.

महाराष्‍ट्राच्‍या चित्ररथाचे कलावंत कौतुकास पात्र ! – एकनाथ शिंदे,  मुख्‍यमंत्री

प्रजासत्ताकदिनी चित्ररथाचे उत्‍कृष्‍ट सादरीकरण करणार्‍या कलावंतांचा सत्‍कार !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात भावपूर्ण वातावरणात गुढीपूजन !

या वेळी ‘हे ब्रह्मदेवा, तुम्‍हीच आम्‍हा सर्व साधकांना साधना करण्‍यासाठी आणि हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करण्‍यासाठी शक्‍ती, बुद्धी, चैतन्‍य अन् आध्‍यात्मिक बळ द्यावे’, अशी प्रार्थना करण्‍यात आली.

सोलापूर येथे ‘मूक पदयात्रे’त ६०० धारकरी उपस्‍थित !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्‍या बलीदानमासाच्‍या निमित्त सोलापूर येथे मूक पदयात्रा काढण्‍यात आली.