नागपूर येथे ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची मूर्ती आढळल्यास १० सहस्र दंड !

महापालिकेने शास्त्रानुसार शाडूच्या अल्प फूट उंचीच्या मूर्ती वापरण्याविषयी नागरिकांचे प्रबोधन केले पाहिजे !

देवतांचे विडंबन करणार्‍या ‘संगीत वस्त्रहरण’ नाटकाच्या विरोधात तक्रार

येथील ‘श्रीशिवकार्य प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले यांनी हिंदूंच्या देवतांचे विडंबन असणार्‍या ‘संगीत वस्त्रहरण’ या नाटकाच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यांनी २२ ऑगस्ट या दिवशी लिखित तक्रार मुलुंड पोलीस ठाण्यात दिली.

मुलीच्या आत्महत्येची चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा ! – ओमकार शुक्ल, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप सांस्कृतिक प्रकोष्ट

भाजपचे सांस्कृतिक प्रकोष्टचे प्रदेश उपाध्यक्ष ओमकार शुक्ल यांनी पोलीस उपअधीक्षक प्रणित गिल्डा यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे, तसेच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले आहे.

महाविकास आघाडीच्या ‘महाराष्ट्र बंद’ला न्यायालयाने अनुमती नाकारली

कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची अनुमती नाही. कुणी तसा प्रयत्न करत असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश देऊन २४ ऑगस्ट या दिवशी महाविकास आघाडीने घोषित केलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मुंबई उच्च न्यायालयाने अनुमती नाकारली आहे.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार ही देशातील हिंदूंसाठी धोक्याची घंटा ! – नितीन शिंदे, माजी आमदार

हिरव्या सापांना भारताने दूध पाजायचे काम केले आहे. हे संकट देशाच्या उंबरठ्यावर येऊन पोचलेले आहे. हिंदूंसाठी ही धोक्याची घंटा आहे. हिंदूंनी वेळीच सावध होऊन एकजूट दाखवावी, असे आवाहन हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी केले.

२५ ऑगस्ट या दिवशी सीबीडी येथे ‘हिंदु संमेलना’चे आयोजन

सीबीडी सेक्टर ३ येथील वारकरी भवनमध्ये २५ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ५ वाजता हे संमेलन होणार आहे. हिंदूंनी उपस्थित रहाण्याचे आवाहन

‘ड्रोन’द्वारे महाराष्ट्राच्या मंत्रालयावर लक्ष, सुरक्षेचा ४१ कोटी रुपयांचा आराखडा !

सुरक्षेच्या दुसर्‍या टप्प्यामध्ये मंत्री गेट, आरसा गेट, गार्डन गेट आणि एनएबी गेट या चारही प्रवेशद्वारांवर मंत्रालयात प्रवेश करणार्‍यांची संपूर्ण पडताळणी करणारी यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

शाळांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष नियमावली सिद्ध करा ! – अकोला बार असोसिएशनचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

या निवेदनात बदलापूर घटनेतील आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली. या प्रसंगी ‘महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिल’चे सदस्य ज्येष्ठ अधिवक्ता मोतीसिंगजी मोहता, उपाध्यक्ष नरेंद्र बेलसरे, सचिव दुष्यंत धोत्रे उपस्थित होते.

सोलापूरहून गांजा विक्रीसाठी घेऊन आलेल्या धर्मांधाला पुणे येथे अटक !

लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

रक्ताचे नमुने पालटणार्‍या सर्वच आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला !

अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल, आई शिवानी अग्रवाल, ‘ससून’चे आधुनिक वैद्य अजय तावरे, आपत्कालीन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरि हाळनोर, अशपाक मकानदार, अमर गायकवाड हे आरोपी येरवडा कारागृहात असून त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.