वर्ष २०२४ पर्यंत भारत ‘हिंदु राष्ट्र’ होईल ! – आमदार सुरेंद्र सिंह, भाजप

वर्ष २०२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. तोपर्यंत म्हणजे २०२४ पर्यंत भारत ‘हिंदु राष्ट्र’ होईल, असे उत्तरप्रदेशातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले.

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे पुजार्‍याच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून क्रूरपणे हत्या

गाझियाबाद जिल्ह्यातील मोदीनगर येथे एका पुजार्‍याच्या १५ वर्षीय मुलीवर अज्ञातांनी सामूहिक बलात्कार करून तिची क्रूरपणे हत्या केली.

हनुमानाचे १३० वर्षांपूर्वीचे मंदिर पाडणे अशक्य : मोठी यंत्रेही बंद पडली !

येथील महामार्गाच्या रूंदीकरणासाठी कचियानी खेडाजवळ असलेले हनुमानाचे १३० वर्षांपूर्वीचे मंदिर पाडण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी हे मंदिर पाडणे शक्य होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

अलीगड(उत्तरप्रदेश) येथील इस्लामी शाळेतील पाठ्यपुस्तकात डॉ. झाकीर नाईकचा ‘हिरो’ असा उल्लेख

धार्मिक प्रवचनांच्या नावाखाली कट्टर इस्लामचा प्रचार करत तरुणांची डोकी भडकवणे, आतंकवाद्यांना पैसा पुरवणे यांसह इतर आर्थिक गुन्ह्यांसाठी भारतातील अन्वेषण यंत्रणांना वादग्रस्त धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक हवा आहे.

सनातनचे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे ग्रेटर नोएडा येथील शारदा विद्यापिठात मार्गदर्शन

नोएडा (उत्तरप्रदेश) – येथील शारदा विद्यापिठामध्ये १२ जानेवारी या दिवशी सनातनचे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी मन:शांतीसाठी नामजपाच्या पद्धती या विषयावर मार्गदर्शन केले.

पत्नीला मारहाण करून पतीने दूरभाषवरून तलाक दिला

कौशाम्बी जिल्ह्यात दारूच्या नशेत असणार्‍या महंमद सोहराब उपाख्य असलम याने दूरभाषवरून पत्नीला तलाक दिल्याची घटना समोर आली आहे.

माजी निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन वृद्धाश्रमात

देशातील निवडणूक प्रणालीचा चेहरामोहरा पालटणारे माजी निवडणूक आयुक्त टी.एन्. शेषन सध्या वृद्धाश्रमात रहात आहेत. ८५ वर्षीय शेषन यांना स्मृतीभ्रंशाच्या व्याधीने ग्रासले आहे.

मदरशांमधून आधुनिक वैद्य आणि अभियंते नव्हे, तर आतंकवादी निर्माण होतात ! – वसीम रिजवी, शिया वक्फ बोर्ड

मदरशांमधून आधुनिक वैद्य आणि अभियंते नव्हे, तर आतंकवादी निर्माण होतात, असे वक्तव्य उत्तरप्रदेश राज्यातील ‘शिया सेंट्रल वक्फ बोर्डा’चे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी येथे केले.

उत्तर भारतात थंडीचा कडाका : २० जणांचा मृत्यू

उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. उत्तरप्रदेशमध्ये थंडीने गारठून २० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मऊ, बलिया, चंदौली, भदोही, जौनपुर आणि वाराणसी येथील नागरिकांचा समावेश आहे

‘वन्दे मातरम्’ म्हणण्यावरून मेरठ (उत्तरप्रदेश) महानगरपालिकेत सप, बसप आणि भाजप यांच्या नगरसेवकांत धक्काबुक्की

लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेशमधील मेरठ महानगरपालिकेच्या पहिल्याच बैठकीत ‘वन्दे मातरम्’वरून गदारोळ झाला. या बैठकीला आरंभ झाल्यानंतर बसपाच्या नगरसेवकांनी

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now