मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी

उत्तरप्रदेशच्या पोलीस नियंत्रण कक्षाला १७ जूनच्या रात्री अज्ञाताने दूरभाष करून श्रीकृष्ण जन्मस्थान आणि ईदगाह मैदान बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी दिली. यानंतर येथील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

उत्तरप्रदेशमधील भाजपच्या आमदारावर अज्ञातांकडून आक्रमण

येथील लोनी मतदारसंघातील भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांच्यावर अज्ञातांनी आक्रमण केल्याची घटना घडली आहे. ते मेरठ येथून परतत असतांना दोन दुचाकींवरून आलेल्या गुंडांनी त्यांच्या वाहनावर गोळीबार केला.

फेसबूकवरून पंतप्रधान मोदी यांना धमकी देणार्‍या नदीम खान विरोधात गुन्हा नोंद

येथील नदीम खान याने भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांच्या फेसबूकवरील लिखाणामध्ये ‘पंतप्रधान मोदी यांना मी गोळ्या झाडून ठार करणार आहे’, अशी प्रतिक्रिया लिहिली होती. याविषयी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी खान यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

वर्ष २०१९ च्या प्रयाग येथील कुंभमेळ्यात अनुसूचीत जाती आणि जमातीमधील ५ महिला महामंडलेश्‍वर होणार !

वर्ष २०१९ मध्ये येथे होणार्‍या कुंभमेळ्यात अनुसूचीत जाती आणि जमातीमधील २२१ महिला अन् ३०० पुरुष सहभागी होणार आहेत. त्यातील ५ महिलांना मौनी अमावस्येच्या आधीच ‘महामंडलेश्‍वर’ उपाधी देण्यात येणार आहे.

हरियाणाच्या पलवल ते कुंडली दरम्यानच्या मार्गावरील १ कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या सामानांची चोरी

हरियाणाच्या पलवल ते कुंडली या मार्गाच्या उद्घाटनानंतर या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या अनेक साहित्यांची २ आठवड्यातच चोरी केल्याचे समोर आले आहे.

प्रयाग येथे चंद्रशेखर आझाद पार्कमध्ये मुसलमानांनी केलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्याची अधिवक्त्यांची मागणी

चंद्रशेखर आझाद पार्कमध्ये मुसलमानांकडून नमाजपठणाच्या नावाखाली अराजकता, अतिक्रमण, अस्वच्छता आणि ध्वनीप्रदूषण केले जात आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

मुसलमानांच्या मोहल्ल्यात ९० टक्के वीज चोरीला जाते; मात्र कारवाई होत नाही ! – भाजपचे आमदार संजय गुप्ता

मुसलमानांच्या मोहल्ल्यात जा आणि तेथील वीज मीटर तपासा. तेथे ९० टक्के वीज चोरीला जाते, असे विधान कोशांबी येथील चायल मतदारसंघातील भाजपचे आमदार संजय गुप्ता यांनी वीज वितरण विभागाच्या एका अधिकार्‍यांशी बोलतांना …..

अकबर नव्हे, तर महाराणा प्रताप महान होते ! – योगी आदित्यनाथ

मोगल बादशहा अकबर महान नव्हता, तर मेवाडचे राजे महाराणा प्रताप हे महान व्यक्तीमत्व होते, असे उद्गार उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्रीयमंत्री अनुप्रिया पटेल यांना पाहून अश्‍लील हातवारे करणार्‍या तिघांना अटक

केंद्रीयमंत्री अनुप्रिया पटेल यांच्याकडे पाहून अश्‍लील हातवारे करणार्‍या तिघा जणांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. पटेल मिर्झापूर या त्यांच्या लोकसभा मतदारसंघातून वाराणसीला परतत असतांना १० जूनच्या रात्री ही घटना घडली.

पुरातत्व विभागाने शिवमंदिराकडे जाणारा मार्ग बंद केल्यामुळे विहिंपकडून ताजमहालचे पश्‍चिमेकडील प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयत्न

विश्‍व हिंदु परिषदेच्या २० ते २५ कार्यकर्त्यांनी १० जून या दिवशी ताजमहालचे पश्‍चिमेकडील प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयत्न केला. याची एक चित्रफीत सध्या सामाजिक माध्यमातून सर्वत्र प्रसारित होत आहे.


Multi Language |Offline reading | PDF