पैठण तालुक्यातील मारुति मंदिरात चोरी !
जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ढोरकीन गावातील मारुति मंदिरात चोरी झाल्याची घटना ७ नोव्हेंबर या दिवशी उघडकीस आली. चोरट्यांनी मूर्तीवरील ७० सहस्र रुपयांचे दागिने चोरले आहेत.
जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ढोरकीन गावातील मारुति मंदिरात चोरी झाल्याची घटना ७ नोव्हेंबर या दिवशी उघडकीस आली. चोरट्यांनी मूर्तीवरील ७० सहस्र रुपयांचे दागिने चोरले आहेत.
१२ नोव्हेंबर या दिवशी असलेल्या पंढरपूर येथील कार्तिक यात्रेसाठी भाविक आणि वारकरी यांच्या सोयीसाठी कोल्हापूर विभागाच्या वतीने ११५ अधिक एस्.टी. गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुख्खू यांच्यासाठी मागवण्यात आलेले समोसे त्यांच्यापर्यंत न पोचल्याने याची राज्य अन्वेषण पथकाकडून (सीआयडीकडून) चौकशी करण्यात आली. हे समोसे आणि केक यांवरून वाद निर्माण झाला आहे…
विरोधी पक्षांच्या ‘इंडी’ आघाडीच्या ४ पिढ्या आल्या, तरी आम्ही जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम मागे घेणार नाही. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार असून त्यांच्या नेतृत्वात भारत जगातील शक्तीशाली देश बनला आहे.
मुंबई पोलिसांनी दक्षिण मुंबईतील व्यवसायिकाच्या ठिकाणी केलेल्या कारवाईत सव्वा दोन कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. ही रक्कम प्राप्तीकर विभागाच्या अधिकार्यांच्या कह्यात देण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यातील गडदुर्गांचा ऐतिहासिक संदर्भासह मागोवा घेणार्या श्री. महेश कदम लिखित ‘सांगली जिल्ह्यातील गड-कोट-वाडे’ या पुस्तकाचे प्रकाशन लोकमान्य टिळक स्मारक येथे नुकतेच करण्यात आले.
साध्या कामांपासून ते मोठी कामे करण्यासाठी लाच घेणार्यांवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर जरब बसवणे आवश्यक !
न्यायालयीन प्रकरण हाताळतांना दिरंगाई आणि निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी चेतावणी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी विधी विभागातील अधिकार्यांना दिली आहे.
जनतेच्या आरोग्याशी खेळणार्यांचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांची दुकाने कायमस्वरूपी बंद करावीत, असेच सर्वसामान्य जनतेला वाटते !
सनातन संस्थेच्या सौ. तृप्ती जोशी यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.