‘प्रॉव्हिडंड फंड’वरील व्याजदरात वाढ !
केंद्रशासनाच्या ‘सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज’च्या बैठकीत कर्मचार्यांच्या प्रॉव्हिडंड फंड (पी.एफ्.) रकमेवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे वृत्त ‘फायनान्शिअल एक्सप्रेस’ने दिले आहे. देशभरात सध्या जवळपास ५ कोटी पी.एफ्. खातेधारक असून त्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.