देहलीच्या जहांगीरपुरीमध्ये रामभक्तांनी शांततेत काढली विनाअनुमती शोभायात्रा !

कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली पोलिसांनी नाकारली होती अनुमती !

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मुलीला अमेरिकेत खलिस्तानवाद्यांकडून धमकी

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची अमेरिकेत रहाणारी मुलगी सीरत यांना खलिस्तानवाद्यांकडून दूरभाष करून धमकी देण्यात आली, तसेच शिवीगाळ करण्यात आली. सीरत ही भगवंत मान यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे.

वडोदरा (गुजरात) येथे रामनवमी मिरवणुकीवर मशिदीजवळ दगडफेक  

अशा घटना कायमच्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

‘वंदे भारत’ एक्सप्रेसवर दगडफेक करणार्‍यांना होणार ५ वर्षांची शिक्षा !

भारतात ‘वंदे भारत’ एक्सप्रेस चालू झाल्यापासून प्रवाशांसाठी प्रवास अतिशय सोपा आणि आरामदायी झाला आहे; पण जसे केंद्र सरकार ‘वंदे भारत’ एक्सप्रेस अधिक मार्गांवर चालू करत आहे, तसे या एक्सप्रेसवर दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

भोपाळ (मध्यप्रदेश) येथील मंदिरावरील भोंग्यांवरून उपविभागीय अधिकार्‍यांची मंदिर व्यवस्थापनाला नोटीस !

मशिदींवरील भोंग्यांविषयी तक्रारी केल्यावर उपविभागीय अधिकारी अशीच तत्परतेने कृती करतात का ?

आशुतोष बापट यांच्या ‘सफर चिपळूण गुहागर परिसराची’ या पुस्तकाचे २ एप्रिलला चिपळुणात प्रकाशन

चिपळूण-गुहागरच्या इतिहासाचे अनेक पदर ‘सफर चिपळूण गुहागर परिसराची’ या पुस्तकातून उलगडण्यात आले आहेत. पूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील तालुके गावावरून नव्हे, तर तेथील किल्ल्यांच्या नावाने ओळखले जात.

विधानसभेत स्वयंपूर्ण गोव्यासाठीचा अर्थसंकल्प सादर

जनतेचे जीवनमान उंचावण्यावर भर ! कितीही अडचणी आल्या, तरी सरकार समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी कटीबद्ध आहे. अर्थसंकल्प हे केवळ आकडे नाहीत, तर त्यातून जनतेचे जीवनमान उंचावण्यावर भर देण्यात आला आहे.

#Exclusive : चालक-वाहक यांच्या विश्रामगृहाची दुरवस्था असलेले वणी (यवतमाळ) बसस्थानक !

बसस्थानकांची विदारक स्थिती पालटली आणि तिथे मूलभूत सोयी उपलब्ध झाल्या, तर ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे परिवहन मंडळाचे ब्रीदवाक्य अधिक खरे ठरेल. ‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल !

पनवेलजवळील बंबईपाडा येथे बांधकाम व्‍यावसायिक महिलेवर गोळीबार

पनवेलजवळील बंबईपाडा येथे एका बांधकाम व्‍यावसायिक  महिलेवर (वय वर्षे ३०) गोळीबार झाल्‍याची घटना २८ मार्चच्‍या सायंकाळी घडली. व्‍यवसायाच्‍या वादातून ही घटना घडल्‍याचे म्‍हटले जात आहे.

डोंबिवली (जिल्‍हा ठाणे) येथे रिक्‍शाचालकाकडून प्रवाशावर आक्रमण

डोंबिवली पूर्व भागातील इंदिरा चौकात २७ मार्चच्‍या रात्री एका रिक्‍शाचालकाने प्रवाशाला लाथाबुक्‍के आणि बांबू यांच्‍या काठीने मारहाण केली. वाढीव भाडे देण्‍यास प्रवाशाने नकार दिल्‍याने रिक्‍शाचालकाने हा प्रकार केला.