मुंबई येथे घातपाताच्‍या शक्‍यतेने ११ जूनपर्यंत कठोर निर्बंध लागू !

येथे २८ मे ते ११ जून या कालावधीत कठोर निर्बंध लावण्‍याचे आदेश मुंबई पोलिसांकडून देण्‍यात आले आहेत. उपायुक्‍त विशाल ठाकूर यांनी हे आदेश पत्राद्वारे काढले असून त्‍यांची माहिती शहरातील शेवटच्‍या व्‍यक्‍तीपर्यंत विविध माध्‍यमांतून पोचवण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले आहे.

नगर येथे किरकोळ कारणावरून प्राणघातक आक्रमण करणार्‍या १०० ते १५० धर्मांधांविरोधात गुन्‍हा नोंद !

पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सांगितले की, संगमनेर शहराची कायदा, सुव्‍यवस्‍था, शांतता बिघडवण्‍याचा कुणी प्रयत्न करत असेल आणि तो कुणीही आणि कितीही मोठा असला तरी अशा गुन्‍हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही. आरोपींवर पोलीस कडक कारवाई करतील.

शेतीला प्रारंभ होण्‍यापूर्वीच राज्‍यात आढळले लाखो रुपयांचे बोगस खतांचे साठे !

राज्‍यात शेतीला प्रारंभ होण्‍यापूर्वी राज्‍यात लाखो रुपयांचे बोगस खतांचे साठे सापडले आहेत. १ एप्रिलपासून भरारी पथकाकडून करण्‍यात आलेल्‍या कारवाईत अवघ्‍या दीड मासात राज्‍यात १८.४० मेट्रिक टन बोगस खतांचा साठा सापडला आहे.

राज्‍यातील ५५ सहस्र ७९७ कर्तबगार महिलांचा सन्‍मान करणार ! – मंगलप्रभात लोढा, मंत्री, महिला आणि बाल विकासमंत्री

पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांच्‍या जयंतीनिमित्त राज्‍यशासन राज्‍यातील २७ सहस्र ८९७ ग्रामपंचायतींमधील ५५ सहस्र ७९७ कर्तबगार महिलांचा सन्‍मान करणार आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

४२४ लघुउद्योजकांना सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार कर भरण्‍यासाठी नोटिसा ! – सुजाता ढोले, अतिरिक्‍त आयुक्‍त, नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई महापालिकेचा मालमत्ता कर भरण्‍यास नकार देणार्‍या ४२४ लघुउद्योजकांना सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार कर भरण्‍यासाठी नोटिसा बजावण्‍यास प्रारंभ केला आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेच्‍या अतिरिक्‍त आयुक्‍त सुजाता ढोले यांनी दिली.

रामराज्य असेल, तरच न्याय प्रस्थापित होईल ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

‘रामराज्य’ असे म्हणतांना जी गोष्ट येते, ती ‘हिंदु राष्ट्र’ असे म्हणतांना येत नाही. आम्हाला हिंदु राष्ट्र नको आहे. आमची रामराज्याची इच्छा आहे. हिंदु राष्ट्र रावण आणि कंस यांचेही होते; पण प्रजेला त्रास झाला.

भिलाई (छत्तीसगड) येथे हसन खान याच्याकडून गायीवर  बलात्कार !

अशा वासनांधांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी हिंदूंनी सरकारवर दबाव आणला पाहिजे ! अशा वेळी प्राणीप्रेमी कुठल्या बिळात जाऊन लपतात ? यावरून त्यांचे प्राणीप्रेमी किती ढोंगी आहे, हेच स्पष्ट होते !

मारेकरी साहिल खान याला हत्या केल्याचा जराही पश्‍चाताप नाही !

साहिलने त्याच्या ‘इंस्टाग्राम अकाऊंट’वर एका पोस्टमध्ये ‘जग आपल्याला शांतपणे जगू देत नाही. दहशत पसरवणे आवश्यक आहे’, असा चिथावणीखोर मजकूर प्रसारित केला होता.

ए.पी.एम्.सी. परिसरातील बस थांबे अडवणार्‍या ५० हून अधिक बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई !

ए.पी.एम्.सी. परिसरातील फळ मार्केटसह आय.सी.एल्. शाळा आणि अन्य गर्दीच्या बस थांब्यांवर वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या बेशिस्त वाहनचालकांवर एपीएम्सी वाहतूक पोलीस शाखेद्वारे कारवाई करण्यात आली.

जम्मूमध्ये बस खोल दरीत कोसळून १० जणांचा मृत्यू

पंजाबमधील अमृतसरहून जम्मूमधील कटरा येथे जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण घायाळ झालेत.