१५ दिवसांत समस्या मार्गी न लागल्यास ‘रास्ता रोखा’आंदोलन

ग्रामस्थांनीही वारंवार तक्रारी केल्या, तरी त्याची दखल घेतली जात नाही. भविष्यात अपघात घडल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यासाठी उत्तरदायी रहातील.

आंबा आणि काजू बागायतदारांचे २५ जुलै या दिवशी आंदोलन

शेत किंवा बाग यांमध्ये काम करत असतांना सर्पदंश, जंगली श्वापदे, झाडावरून पडणे, फवारणी करतांना विषबाधा, हृदयविकार इ. मुळे मृत्यू आल्यास दोन्ही विमा संरक्षण मिळावे.

आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण करा !

गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, वादळे अशा नैसर्गिक आपत्ती आणि पालटत्या वातावरणामुळे आंबा अन् काजू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत.

पुण्यात अटक केलेल्या आतंकवाद्यांकडून ‘ड्रोन कॅमेरे’, तसेच विध्वंसक कारवायांसाठी वापरण्यात येणारी पावडर जप्त !

‘ड्रोन कॅमेर्‍यां’द्वारे चित्रीकरणात नेमके काय आहे ?’, ‘पुण्यातील कोणत्या परिसरातील चित्रीकरण केले आहे ?’, ‘यात पुण्याच्या बाहेरचे चित्रीकरण केले आहे का ?’, आदींचे अन्वेषण पोलीस करत आहेत.

चंद्रपूर येथे पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या बैठकीला उलगुलान संघटना आणि आंबेडकरवादी संघटना यांचा विरोध !

चंद्रपूर येथील अग्रसेन भवन परिसरात २३ जुलै या दिवशी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते; मात्र भिडेगुरुजी यांचा चंद्रपूर जिल्हाप्रवेश आणि बैठक यांना उलगुलान संघटना आणि आंबेडकरवादी संघटना यांनी तीव्र विरोध केला.

‘झी ५’ ओटीटी  मंचावर प्रदर्शित होणार ‘द कश्मीर फाईल्स : अनरिपोर्टेबल’ नावाची वेब सीरिज !

झी ५’ या ‘ओटीटी’ मंचावर ‘द कश्मीर फाईल्स : अनरिपोर्टेबल’ (उघड न झालेले) नावाची वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.

जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासाला चालना देऊ ! – कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी 

सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी २२ जुलै या दिवशी मिलिंद शंभरकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. या वेळी कुमार आशीर्वाद म्हणाले की, माझा सोलापूर जिल्ह्याचा अभ्यास आहे. येथील समस्याही ठाऊक आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा विकास करण्यावर भर देऊ.

उंब्रज (तालुका कराड) येथील गोरक्षक वैभव जाधव यांचा सत्कार !

‘गोशाला महासंघ महाराष्ट्र गोरक्षा स्थली स्मारक समिती, पुसद’ (जिल्हा यवतमाळ) यांच्या वतीने गोरक्षण क्षेत्रात काम करणार्‍या महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळा यांचा सत्कार करण्यात आला.

पावसाळी अधिवेशनाच्या बातम्या वाचण्यासाठी हा क्यू.आर्. कोड वापरा !

पावसाळी अधिवेशनानिमित्त ‘सनातन प्रभात’च्या विशेष प्रतिनिधींना विविध मंत्री आणि आमदार यांनी दिलेल्या मुलाखतींचे व्हिडिओ पहाण्यासाठी

शिरूर (पुणे) येथे कत्तलीसाठी नेणार्‍या २२ वासरांची सुटका !

जर्सी गायीच्या ३ ते ४ दिवसांच्या २२ वासरांची कत्तलीसाठी मांडवगण फराटा (ता. शिरूर) परिसरातून वाहतूक करण्यात येत होती. विकास शेडगे या गाडीचा पाठलाग करत होते. त्यांनी याविषयी मांडवगण फराटा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत सापळा लावून गाडी पकडली आणि सर्व वासरांची सुटका केली.