नागपूर, अमरावती आणि मराठवाडा विभागांत ३ वर्षांत ७ सहस्र ९२ शेतकर्‍यांच्या आत्महत्या !

नागपूर विभागात ९५७, अमरावती विभागात ३ सहस्र ४५२, तर मराठवाडा विभागात २ सहस्र ६८३ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशी माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाकडून विधानसभेत देण्यात आली.

ज्‍येष्‍ठ अभिनेते जयंत सावरकर काळाच्‍या पडद्याआड

मराठी नाट्यसृष्‍टी आणि चित्रपटसृष्‍टी यांतील ज्‍येष्‍ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्‍या ८८ व्‍या वर्षी त्‍यांनी अखेरचा श्‍वास घेतला. गेल्‍या काही दिवसांपासून ते आजारी होते. जयंत सावरकर हे गेल्‍या काही वर्षांपासून ठाणे येथे वास्‍तव्‍य करत होते.

डॉ. तात्‍याराव लहाने यांनी राजकारणामुळे त्‍यागपत्र दिल्‍याचा आरोप सरकारने फेटाळला !

डॉ. लहाने यांनी दिलेल्‍या त्‍यागपत्राविषयी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी २४ जुलैला याविषयी तारांकित प्रश्‍न उपस्‍थित केला होता.

सेवाभावी वृत्तीने चालणार्‍या वास्‍तूंच्‍या व्‍यावसायिक भाड्यात सरकार कपात करणार !

लोकप्रतिनिधींच्‍या निधीतून बांधण्‍यात येणार्‍या व्‍यायायशाळा, अभ्‍यासिका, ज्‍येष्‍ठ नागरिक संघ आदी वास्‍तू सेवाभावी वृत्तीने चालवल्‍या जातात. त्‍यांना व्‍यावसायिक दराने भाडे आकारणी केली जाते.

पुणे येथील पी.एम्.पी.एम्.एल्.च्‍या ३६ कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई; ३ बडतर्फ !

२२ जुलै या दिवशी केलेल्‍या पहाणीत विविध डेपोंतील ७८ वाहक आणि ६४ चालक उपस्‍थित नसल्‍याचे दिसून आले. त्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदारांचे ५० सहस्र कोटी रुपये देणे ! – बाळासाहेब थोरात, आमदार, राष्‍ट्रीय काँग्रेस

सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ एका नगर जिल्‍ह्यात ठेकेदारांचे ६२० कोटी रुपये देणे असून राज्‍यात ठेकेदारांचे ५० सहस्र कोटी रुपये देणे आहे, असा आरोप सदस्‍य बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत पुरवणी मागण्‍यांवरील चर्चेच्‍या वेळी केला.

कोल्‍हापूर जिल्‍हा बजरंग दल संयोजकपदी पराग फडणीस यांची नियुक्‍ती !

विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल यांची प्रांत स्‍तरावरील बैठक नुकतीच पिंपरी-चिंचवड येथे पार पडली. या बैठकीत कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्‍या विविध पदांवरील नियुक्‍त्‍या करण्‍यात आल्‍या.

चंद्रपुरातील राजुरा येथे अज्ञात व्‍यक्‍तीने केलेल्‍या गोळीबारात भाजप पदाधिकार्‍याच्‍या पत्नीचा मृत्‍यू !

सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले की, या दुर्दैवी घटनेची गांभीर्यपूर्वक नोंद घेऊन अशा पद्धतीने अवैधरित्‍या शस्‍त्र बाळगणारे, गोळीबार करणारे आणि समाजामध्‍ये भीतीचे वातावरण पसरवणारे यांवर कठोर कारवाई करावी.

पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल : ठिकठिकाणी नागरिकांचे स्‍थलांतर चालू !

कोल्‍हापूर जिल्‍ह्यात जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्‍कळीत !

‘अ‍ॅट्रॉसिटी’चे गुन्‍हे मागे घेण्‍यासाठी १५ गावांनी बंद पाळत काढला जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

सांगली जिल्‍ह्यातील मिरज तालुक्‍यामधील बेडगमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या नावाने उभारल्‍या जात असलेल्‍या कमानीचे खांब पाडल्‍याच्‍या प्रकरणी सरपंच, उपसरपंच यांसह तिघांवर गुन्‍हे नोंद करण्‍यात आले आहेत.