कुरकुंभ येथील अमली पदार्थ देहलीहून नंतर लंडनला पाठवले !

विमानाने ‘फूड डिलिव्हरी सर्व्हिस’च्या माध्यमातून अमली पदार्थ पाठवण्याची घटना उघडकीस आलेली आहे . या ड्रग्जची किंमत साधारण २८० कोटी रुपये असून या प्रकरणात आतापर्यंत एकूण ८ जणांना अटक करण्यात आली आहे.

पिंपरी (पुणे) येथे भारतीय चलनातील ७० सहस्र रुपयांच्या बनावट नोटा जप्त !

चीनमधून ऑनलाईन माध्यमाद्वारे कागद मागवून त्यावर भारतीय चलनातील बनावट नोटा छापण्यात आल्या असून पोलिसांनी यातील प्रमुख ६ जणांना अटक केली. त्यांच्याकडून ७० सहस्र रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

Rajgad Water Pollution : पुणे जिल्ह्यातील राजगडावरील पिण्याचे पाणी प्रदूषित !

झोपी गेलेला पुरातत्व विभाग ! महाराष्ट्रातील गड-दुर्गांची दुःस्थिती होण्यास उत्तरदायी असलेला पुरातत्व विभाग विसर्जित करा !

गारपिटीने झालेल्या हानीचे तात्काळ पंचनामे केले जातील !

‘महाराष्ट्रातील ५ ते ६ जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊन पिकांची हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे, ही स्थिती खरी आहे. त्या हानीचे तात्काळ पंचनामे करावेत, असे आदेश दिले आहेत.

अनधिकृत मशिदीचे बांधकाम हटवण्यात आले !

बेकायदेशीर बांधकामे हटवण्यासाठी हिंदूंना वारंवार चेतावणी द्यावी लागणे दुर्दैवी असल्याने हिंदु राष्ट्राची स्थापना अनिवार्य !

धर्मनाथ बीज उत्सव संकटमुक्त आनंद देणारा सोहळा ! – प्रवचनकार मिलिंद चवंडके

धर्मनाथ बीज उत्सव संकटमुक्त आनंद देणारा सोहळा आहे. आपल्या प्रपंचामधील संकटे भस्मसात् व्हावीत; म्हणून नाथ संप्रदायाच्या पद्धतीने घरा-घरात धर्मनाथ बीज उत्सव श्रद्धेने साजरा करावा, असे आवाहन नाथ संप्रदायाचे संशोधक तथा प्रवचनकार मिलिंद चवंडके यांनी केले.

कला आणि संस्कृती क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी समिती नियुक्त करणार ! – मुख्यमंत्री

महाराष्ट्राला कला आणि संस्कृती यांचा अत्यंत गौरवशाली वारसा लाभला आहे. कला आणि संस्कृती यांच्याशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.

२६ फेब्रुवारीपासून राज्यात मराठा आरक्षण लागू !

२६ फेब्रुवारीपासून राज्यात मराठा आरक्षण लागू झाले असून त्यासंदर्भातील कार्यवाही करण्यास प्रारंभ झाला आहे. यामध्ये शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आले आहे.

रा.स्व. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालकपदी नानासाहेब अण्णाजी तथा सुरेश जाधव यांची निवड !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या २५ फेब्रुवारीला पुणे येथे झालेल्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतीय बैठकीत प्रांत संघचालकपदी नगर येथील नानासाहेब अण्णाजी तथा सुरेश जाधव यांची निवड करण्यात आली.

जरांगे पाटील यांची एस्.आय.टी. चौकशी झाली पाहिजे ! – प्रवीण दरेकर, विधान परिषदेचे गटनेते

मनोज जरांगे यांनी विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर आरोप केले. त्याची चौकशी झाली पाहिजे.